त्या आगग्रस्त कुटूंबियांना आमदार दाम्पत्याकडून प्रत्येकी १० हजारांची मदत.. चंद्रकांत अण्णा समर्थकांकडून जीवनावश्यक वस्तूंचा हातभार

 त्या आगग्रस्त कुटूंबियांना आमदार दाम्पत्याकडून प्रत्येकी १० हजारांची मदत.. चंद्रकांत अण्णा समर्थकांकडून जीवनावश्यक वस्तूंचा हातभार


चोपडा,दि.३१(प्रतिनिधी) तालुक्यातील वटार गावी आगग्रस्त कुटूंबियांचे संसार उद्धवस्त होऊन उघड्यावर आल्याचे दुःखदायक वृत्त कानावर पडताच  आमदार सौ.लताताई सोनवणे व माजी आमदार अण्णासाहेब चंद्रकांत सोनवणे यांनी क्षणाचाही विलंब न दवडू देता प्रति कुटूंबियांना १० हजार रुपयांची मदत पोहचती केली आहे.नुकतचे कार अपघातात जखमी असल्यावरही कार्यकर्त्यांमार्फत तिघा कुटूंबियांना ३०हजारांचा  आर्थिक हातभार लावल्याने कुटूंबियांचे डोळ्यातून अश्रू धारा तरळल्या. स्वतः दुःखी असतांना दुसऱ्याच्या  सुखाची आस असणाऱ्या लोक प्रतिनिधींच्या महान विचारांचे ओझे मन गहिवरून आणणारे असून जीवनाला धीर देणारी उर्जा असल्याचे मत आगीची दुःखद झळ बसलेल्या परिवारांनी व्यक्त केले आहे.शिवाय चंद्रकांत अण्णा समर्थकांनी कपडे,भांडी, किराणा आदि साहित्य देऊन मोलाचा हात दिला असून पत्रेही देण्याचे नियोजन केले आहे.  

वटार गावी भयानक आगीने तिनं कुटूंबियांचा संसार उद्धवस्त झाला आहे त्यांना सर्व स्तरातून मदतीची नितांत गरज आहे हा मुख्य विचार करून आमदार सोनवणे दाम्पत्याने प्रत्येकी १० हजारांची आर्थिक मदत पं.स.माजी सभापती कांतीलाल पाटील,भोपाल पाटील,किरण देवराज,कडू कोळी, गुलाब ठाकरे यांच्या हस्ते देण्यात आली यावेळी नामदेव पाटील, मंगल इंगळे, बाळू दगडू कोळी, पो.पा रविद्र पाटील, धनराज पाटील, गोपाल ठाकरे, समाधान ठाकरे, नानाजी पाटील, नवल ठाकरे ,लोकेश काबरा, वामुदेव ठाकरे, पि.डी महाजन, मनोज ठाकरे, कृ.उ.बा  सभापती नरेंद्र पाटील, विजय पाटील आदी मान्यवर उपस्थित होते  ही मदत वटार  गावी आग लागून  नुकसान झालेले भिकुबाई सुभाष ठाकरे,कैलास भिका ठाकरे,धनसिंग खंडू कोळी  यांना देण्यात आली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने