वटारच्या संकटग्रस्त कुटूंबियांना धान्याची मदत.."समाज माझा अन् मी समाजाचा" प्रत्ययाने ह्रदये धडधडली

 वटारच्या संकटग्रस्त कुटूंबियांना धान्याची मदत.."समाज माझा अन् मी समाजाचा" प्रत्ययाने ह्रदये धडधडली


चोपडा दि.३१(प्रतिनिधी)  समाज माझा अन् मी समाजाचा  हा विशाल विचार मनात घेऊन कोळी समाज बांधवांनी एकत्रित येऊन   वटार ता चोपडा येथे गॅस हडीं लीक झाल्याने .. संसारोपयोगी वस्तू जळून खाक झालेल्या कुटूंबियांनाआधार म्हणून जीवनावश्यक वस्तूंची मदत देऊन मोलाचा हात दिल्याचे माणुसकीचे दर्शन आज रोजी घडले.

  या  महान विचारांचे धनी मगन बाविस्करसर (जिल्हा अध्यक्ष अनुसूचित जमाती भा.ज.पा), भरत भाऊ बाविस्कर( प. स .सदस्य चोपडा), विजय बाविस्कर (जिल्हा उपाध्यक्ष कामगार आघाडी जळगाव), गोपाल कोळी (सरपंच वटार), विलास बाविस्कर (पंचायत राज विभागीय संयोजक भा. ज पा), धनराज पाटील (बूथ प्रमुख) मनोज कोळी ,समाधान ठाकरे,प्रवीण ठाकरे, गुलाब ठाकरे,  सतीश कोळी या समाज बांधवांनी एकत्रित येऊन आगीत जीवनातील स्वप्नांची राख रांगोळी झालेल्या समाज बांधवांना काही तरी मदत देणे  गरजेचे असल्याचे ध्यानी घेऊन संकटाधिन कुटुंबियांना खाद्यतेल ,गव्हाच्या गोण्या ,बिस्कीट व इतर धान्य मदत म्हणून  देऊन माणुसकीचे दर्शन घडविले आहे. या मदतगारांचे सहकार्य पाहूनच बुडत्यास काठी चा आधार मिळाल्याचे शब्द संकटग्रस्त कुटूंबियांना तोंडून निघाले व आभारही व्यक्त केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने