उद्या कोळी समाजाचा विशाल मोर्चा.. "बोगसआदिवासी"म्हणणाऱ्या संघटनांवर कडक कारवाईची मागणी
चोपडा दि.३१(प्रतिनिधी)- चोपडा तहसील कार्यालयावर उद्या 1 जुन 2023 रोजी सकाळी 11 वाजता आदिवासी अनुसूचित जमातीचे टोकरे, महादेव, मल्हार कोळी जमातींचा आदिवासी विरोधी संघटनांचा चुकीच्या निवेदनाच्या निषेध नोंदविण्याकरिता तहसीलदार यांचेकडे निवेदन देऊन एका आदिवासी जमाती ला बोगस हा गैर शब्द वापरू समाजा समाजामध्ये तेढ निर्माण करू पाहणाऱ्या संबंधितावर कायदेशीर कडक कारवाई करण्यात यावी मागणीसाठी प्रचंड महाकाय मोर्चा काढण्यात येत आहे.
मोर्चासाठी अमळनेर, यावल, रावेर, जळगाव तालुक्यातून मोठ्या संख्येने जमात बांधव येणार असून आजूबाजूच्या जिल्ह्यातील सर्व सामाजिक संघटनांनी जाहीर पाठिंबा देऊन सहभागी होणार आहेत.गेल्या काही दिवसांपासून अपरिपक्व अर्धवट माहितीच्या अधिकारावर आदिवासी कोळी समाजाला बोगस म्हणणाऱ्यांची वा जातीय तेढ निर्माण करणाऱ्यांनी पत्रक बाजी करून समाजाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला आहे. जळगाव जिल्ह्यात जातीचे सक्षम अधिकाऱ्यांनी दिलेले जात प्रमाणपत्र सत्य असून पडताळणी समितीनेहि आपली चौकशी करून पात्र ठरविण्यात आलेले हजारो आदिवासी कोळी बांधव आहेत.खान्देशात आदिवासी कोळी जमात असल्याचे पुरातन नोंद व इतिहास असल्यावरही संपूर्ण समाजाला बोगस म्हणून तेढ निर्माण करू पाहत असलेल्या संघटनांची चौकशी करून कडक कारवाई करावी अशी मागणी संपूर्ण समाजाकडून होतं आहे. तरी सर्व जमात बांधवाना मोठ्या संख्येने उपस्थिती दयावी असे आवाहन महर्षी वाल्मिकी ग्रुप तर्फे करण्यात आले आहे.