सात दिवसांत रस्त्याचे काम सुरू न झाल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन करू : आमदार सौ.लताताई सोनवणे अडावद येथील रास्ता रोको : शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत यशस्वी

 सात दिवसांत रस्त्याचे काम सुरू न झाल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन करू : आमदार सौ.लताताई सोनवणे अडावद येथील रास्ता रोको : शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत यशस्वी



चोपडा,दि.२०(प्रतिनिधी): तालुक्यातील अडावद येथील बस स्थानाकासमोर राष्ट्रीय महामार्ग दुरुस्तीसाठी आमदार लताताई चंद्रकांत सोनवणे यांनी माजी आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या नेतृत्वात शेकडो कार्यकर्त्यांसह रास्ता रोको केला. यावेळी प्राधिकरणाने सात दिवसात रस्त्याचे काम करण्याचे लेखी आश्वासन दिले. सात दिवसांत काम सुरू न झाल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन करू असा ईशारा यावेळी आमदार लताताई सोनवणे यांनी महामार्ग प्राधिकरणाच्या अभियंत्यास दिला.

    २१ रोजी सकाळी ९ वाजता अंकलेश्वर - बुऱ्हाणपूर महामार्गावर अडावद बस स्थानाकासमोर आमदार लताताई सोनवणे यांनी शेकडो कार्यकर्त्यांसमवेत  माजी आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन केले. प्रकल्प महाप्रबंधक शिवाजी पवार, महामार्ग प्राधिकरण उपप्रबंधक तकनिकी अभियंता  स्वतंत्र गौरव स्वतंत्र गौरव ,  चंदन गायकवाड , दिग्विजय पाटील, तहसिलदार अनिल गावित यांनी लेखी स्वरूपात पत्रावर लवकरात लवकर कामाला सुरूवात करू असे लेखी पत्र देऊन आश्वस्त केले त्यानंतरच आंदोलन मागे घेण्यात आले.  यावेळी सरपंच भावनाताई पंढरीनाथ माळी, ग्रामपंचायत सदस्य भारतीताई सचिन महाजन, नायजाताई बारेला,   ग्रामपंचायत सदस्य जावेदखा पठाण,  विधानसभा संघटक सुकलाल कोळी, विकासो चेअरमन रमेशचंद्र काबरा,  कृषि उत्पन्न संचालक रावसाहेब पाटील शिवराज पाटील, गोपाल पाटील, नरेद्र पाटील, किरण देवराज,  पंचायत समितीचे माजी सभापती माणिकचंद महाजन,  माजी नगरसेवक राजेद्र जैस्वाल,  विकास पाटील, दिपक चौधरी, कांतिलाल पाटील,  सुनिल बरडिया आदिवासी सेवक संजय शिरसाठ,   मंगल इंगळे,किरण देवराज संचालक बाजार समिती चोपडा,विकासो चेअरमन रमेशचंद्र काबरा, संजय मुरलीधर पाटील, संचालक सचिन महाजन, प्रकाश महाजन, प्रभाकर महाजन, वासुदेव महाजन,  वरगव्हान सरपंच भूषण पाटील,   वडगावाचे सरपंच कडू कोळी,  नामदेव पाटील,   विकासो चेअरमन रमेशचंद्र काबरा,  बबलुभाऊ कोळी, कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती यावल

गोटुभाऊ सोनवणे,  सुधाकर पाटील गिरडगाव, श्रावण कोळी,  किनगाव

विकास सोळंके,  ग्रा.प.सदस्य कोळन्हावी

जगदिश सोळंके,  नाना कोळी,  

आण्णा कोळी डांभुर्णी, राहुल पाटील किनगाव,   सागर ओतारी,  नवल ठाकरे,  विकास महाजन,  संजय बाविस्कर लिलाधर पाटील,  संतोष पाटील,  नाना पाटील, गुलाब ठाकरे,  रविंद्र पाटील,  नाना कोळी, अशोक राणा, नंदू पाटील, मधुकर कासार, एम. के . शेटे, अमोल कासार, आबा महाजन,  संतोष महाजन, विजय कोळी, बलदेव कोळी, गोपीचंद कोळी, भगवान भिल, दंगल भिल, इंदल भिल, ग्रामपंचायत सदस्य अमिनरजा मण्यार, जुनेदखां पठाण, कालू मिस्तरी, रामकृष्ण महाजन, वसंत भिल, रंजना भोई, सुपडाबाई तडवी, यशोदाबाई भिल, पार्वतीबाई भिल, सायतराबाई भिल,नायजाबाई पावरा,समराबाई पावरा, नानीबाई पावरा, राहुल पावरा, मधू भिल,खुमसिंग बारेला, दिलिप बारेला,यासु बारेला,  मिचऱ्या पावरा, गणदास बारेला, बिराम बारेला, दिनेश बारेला, पंचकचे उपसरपंच किशोर पाटील, देवगाव किशोर महाजन यांचेसह शेकडो कार्यकर्ते या ते रास्तारोकोत सहभागी होते.  सहायक पोलीस निरीक्षक गणेश बुवा यांनी चोख बंदोबस्त ठेवलेला होता.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने