चोपडा माध्यमिक पतपेढी अध्यक्षपदी दिनेश बाविस्कर तर उपाध्यक्ष प्रदीप न्हायदे यांची निवड ...सचिव पदी सुभाष पाटील यांची लागणार वर्णी

 चोपडा माध्यमिक पतपेढी  अध्यक्षपदी दिनेश बाविस्कर तर उपाध्यक्ष प्रदीप न्हायदे यांची निवड ...सचिव पदी सुभाष पाटील यांची  लागणार वर्णी 

 चोपडा,दि.२०(प्रतिनिधी )- चोपडा तालुका माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी पतपेढीच्या अध्यक्ष उपाध्यक्ष या दोन्ही पदांसाठी नुकतीच निवड करण्यात आली असून यावेळी   अध्यक्षपदी महात्मा गांधी माध्यमिक विद्यालयाचे माध्यमिक शिक्षक दिनेश नारायण बाविस्कर यांची तर उपाध्यक्षपदी  कमळगाव येथील माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक प्रदीप काशिनाथ न्हायदे यांची  बिनविरोध निवड करण्यात आली आहे .तर पुढच्या येणाऱ्या मीटिंगमध्ये सचिव पदी संपुले येथील माध्यमिक शाळेचे  उपशिक्षक सुभाष पाटील यांची वर्णी लागणार आहे.

 या पतपेढी वर तालुक्यातील माध्यमिक,उच्चमाध्यमिक,तसेच आश्रम शाळा विभागातील मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर संघटना असलेल्या  सहकार गटाचे वर्चस्व असून गेल्यावर्षी झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत सहकार गटाची सत्ता आली होती.

 पहिल्या एका वर्षात चेअरमन म्हणून सुनील चौधरी तर उपाध्यक्ष पदी वंदना भादले तर मानद सचिव म्हणून गुणवतराव वाघ यांनी राजीनामा दिल्याने ही निवडणूक लागली होती. 

 ----

येणाऱ्या मीटिंग मध्ये मानद सचिव म्हणून एकमताने आम्ही सुभाष पाटील यांची निवड करणार आहोत त्यात कुठलाही बदल होणार नाही.बहुमतात असलेल्या आमच्या संचालक मंडळाने सुभाष पाटील यांचे नाव निश्चित केले आहे.

- दिनेश बाविस्कर - 

-अध्यक्ष चोपडा तालुका माध्यमिक पतपेढी

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने