तलाठी आप्पांशी सलगी..तेराशेची लाच घेतांना पंटरची वाजली हलगी..! लाच लूचपत प्रतिबंध विभागाचा बांबरुडात दणका

 तलाठी आप्पांशी सलगी..तेराशेची लाच घेतांना पंटरची वाजली हलगी..!  लाच लूचपत प्रतिबंध विभागाचा बांबरुडात  दणका



चोपडा दि.१७(प्रतिनिधी):पाचोरा तालुक्यातील लासगाव येथील इसमाकडून आईच्या नावाने मंजुर झालेल्या पिककर्जाचा बोझा शेतजमीनीचे ७/१२ उताऱ्यावर घेण्यासाठी  तलाठी आप्पांशी आपले घनिष्ठ संबंध असल्याचे सांगून एक हजार तीनशे साठ  रुपयांची लाच घेणाऱ्या पंटरला लाच लूचपत प्रतिबंध विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून रंगेहाथ पकडल्याची घटना घडली.

 याबाबत अधिक माहिती अशी की,लासगाव येथील  तक्रारदार यांची लासगाव शिवारात आईच्या नावे शेत गट क्रं.१२८/ब/१ हीचे क्षेत्र ०.९१ हेक्टर आर चौ.मी क्षेत्र असलेली शेत जमीन आहे. सदर शेतजमीनीवर तक्रारदार यांच्या आईच्या नावे बँक ऑफ बडोदा शांखा -सामनेर या बँकेकडून १,३०,०००/-रुपये पीककर्ज मंजुर करण्यात आले आहे. सदर मंजुर झालेल्या पिककर्जाचा बोझा शेतजमीनीचे ७/१२ उताऱ्यावर घेण्यासाठी तक्रारदार बांबरुड तलाठी कार्यालयात गेले असता भगवान दशरथ कुंभार, वय-४४ वर्ष, खाजगी इसमरा.बांबरुड, ता.पाचोरा याने  तक्रारदार यांना माझे तलाठी अप्पांशी चांगले संबंध आहेत तुमच्या आईच्या नावे मंजुर झालेल्या पिककर्जाचा बोझा शेतजमीनीचे ७/१२ उताऱ्यावर लावण्याचे काम तलाठी अप्पांकडून करून आणून देतो असे सांगुन सदर कामासाठी तक्रारदार यांच्या आईचे तक्रारदार व साक्षीदाराचे आधारकार्ड झेरॉक्स व आईचे ३ व तक्रारदार यांचे २ पासपोर्ट फोटो घेऊन  १हजार ३६० रुपयांची लाचेची मागणी केली. सदर खाजगी इसमा विरूध्द यांनी तक्रारदार यांनी तक्रार दिल्याने  लाच लूचपत प्रतिबंध विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून पंचासमक्ष  लाचेची रक्कम  बांबरुड येथील  स्वतःचे घरी   स्विकारतांना आरोपीला रंगेहाथ पकडून जेलची हवा दाखविली आहे. 

सदरील कारवाई नाशिक पोलीस अधीक्षक श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर मॅडम,नाशिक अप्पर पोलीस अधीक्षक श्री.एन.एस.न्याहळदे, पोलीस उप अधीक्षकश्री.नरेंद्र पवार , जळगाव  पोलिस निरीक्षक श्रीमती.एन.एन.जाधव  यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप अधीक्षक श्री.शशिकांत पाटील देखरेखीत PI.श्री.संजोग बच्छाव, पो.ना.ईश्वर धनगर, पो.कॉ.राकेश दुसाने,स.फौ.दिनेशसिंग पाटील,स.फौ.सुरेश पाटील,पो.हे.कॉ.सुनिल पाटील, पो.हे.कॉ.रविंद्र घुगे, पो.ना.जनार्दन चौधरी,पो.ना.किशोर महाजन, पो.ना.सुनिल वानखेडे,पो.ना.बाळु मराठे, पो.कॉ.अमोल सुर्यवंशी, पो.कॉ.प्रणेश ठाकुर यांच्या पथकाने केली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने