कामदा एकादशी निमित्त अखंड वीणा वादन सेवेचे आयोजन

 कामदा एकादशी निमित्त अखंड वीणा वादन सेवेचे आयोजन

धरणगाव,दि.३१ (प्रतिनिधी)..श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित धरणगाव येथे परमपूज्य गुरुमाऊली आण्णासाहेब मोरे यांच्या आशीर्वाद व मार्गदर्शनाने दि.1.एप्रिल 2023 शनिवार रोजी सकाळी 8.00 ते संध्याकाळी 6.00 वाजेपर्यंत दिवसभरात अखंड वीणा वादन सेवा आयोजित करण्यात आली आहे. 

संसारिक जीवनातील समस्यांचे निराकरण करणारे उच्च कोटीची सेवा वीणा वादन हे मानवी जीवनातील समस्यांचे निराकरण करून सुखी व आनंदी जीवन जगण्याची गुरुकिल्ली आहे. देवर्षी नारद यांचा हातात असलेल्या विण्याचा आकार  आपण पहिला असेल एखाद्या कुलुपाची किल्लीप्रमाणे आहे याचा अर्थ विद्या सरस्वती व देवर्षी नारद सकल मानव समाजाला सुचित करू इच्छिता की किल्लीप्रमाणे आकार असलेले वीणा हातात घेऊन ईश्वराचे नामस्मरण केले तर मानवी जीवनातील समस्यांचे कुलूप उघडून  सुखी व समाधानी जीवन जगता येईल. याकरिता या सेवेचे महत्व जाणून घेण्यासाठी जास्तीत जास्त महिला व पुरुषांनी तरुण मंडळींनी या सेवेत सहभाग घ्यावा असे आवाहन श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दि.प्र.धरणगाव तालुक्याच्या सेवेकरी परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने