चोपड्यात शिस्तप्रिय दबंग पोनि के.के.पाटील यांचा गुरुजनांनी केला सत्कार

 चोपड्यात शिस्तप्रिय  दबंग पोनि के.के.पाटील यांचा गुरुजनांनी केला सत्कार 

 चोपडा दि.२५(प्रतिनिधी )-येथील शहर पो. स्टेशनचे निरिक्षक के. के. पाटील यांच्या उत्कृष्ट कार्याने भारावलेले प्रताप विद्या मंदिराच्या सेवानिवृत्त शिक्षकांनी आपल्या भावना व्यक्त करत पाटील त्यांचे मनापासून कौतूक केले.पो.नि.पाटील यांनी पदभार स्विकारल्यानंतर बेशिस्त रस्ता वाहतुकीला शिस्त लावली.पोलिसांचा लाठीही न उगारता शहरात वचक निर्माण केल्याबद्दल कौतुकाचे उदगार याप्रसंगी व्यक्त केले.

    या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पो.नि.पाटील यांचा परीचय एस.एच.पाटील यांनी केला .प्रताप विद्या मंदिराचे समन्वयक गोविंद गुजराथी , ए.टी.पाटील , एस. आर. पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. 

 *शालेय जीवनाच्या आठवणींना उजाळा* 

 आपल्या शालेय जीवनातल्या व चोपडे शहरातील त्यांच्या लहानपणीच्या आठवणींना उजाळा देत खूप भारावून गेलेत .अनेक प्रसंग त्यांनी सांगीतले . त्यांनी आपली कौटूंबीक ओळख करून दिली . अत्यंत कठीण व नाजूक परीस्थितीतून शिक्षण घेतले . शिक्षणासाठी ते चोपडा येथे मामांकडे रहात होते . प्रताप विद्या मंदिरातून दहावी पर्यंतचे शिक्षण झाल्या नंतर पुढे एम. पी. एस. सी. झाले.त्यानंतर नोकरी नसल्यामुळे घरच्या थोड्या शेतीतच काम करू लागले . शेतात काम करत असतांनाच त्यांना पोलिस उपनिरिक्षक पदाच्या नोकरी साठी कॉल आला . कुठलेही आर्थीक पाठबळ किंवा वशीला नसतांना त्यांची गुणवत्तेवर निवड झाली. सेवेची संधी मिळाली आणि त्यांनी सोने करून दाखवले.

यावेळी सेवानिवृत्त शिक्षक प्रा. उल्हास गुजराथी , अवधुत ढबू ,डी.आर. परदेशी , एन. व्ही. महाजन , व्ही. एन. पाटील , वाय. एच. चौधरी , साहेबराव पाटील , पी. सी. लोहार , डी. टी. महाजन , जी. एन.पाटील , हिरामण पाटील , तुषार पाटील , अभिनव पाटील तसेच पत्रकार श्रीकांत नेवे हजर होते. डी आर जगताप यांनी आभार मानले

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने