अकोला बाजार येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी

 

अकोला बाजार येथे छत्रपती शिवाजी महाराज  यांची जयंती साजरी


अकोला बाजार,दि.२२ (प्रतिनिधी)
दिनांक 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधत अकोला बाजार येथील शिव प्रतिष्ठान समिती व अकोला बाजार वासियांच्या वतीने ईश्वर देशमुख सभागृह मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मान्यवरांच्या हस्ते पूजन व द्वीपप्रज्वलन करण्यात आले.तसेच यावेळी महाराजांची आरती सुध्दा करण्यात आली.सत्याची ती ढाल होती, निष्ठेची तलवार होतीविरतेचा भाला होता, हर हर महादेवाचा नारा होतासह्याद्रीची साथ होती, घोड्यांच्या टापांचा नादकडेकपारीत फिरत होता,तो मर्द माझा शिवबा वाघ होता वाघ होता असे अनेक श्लोगनचा गर्जनाद करत जयघोष केला. मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैभव जाचक यांनी केले तर आभार प्रदर्शन ऋषीकेश जगताप व अक्षय ठाकरे यांनी केले तसेच दुपारी संपूर्ण शिवप्रेमींनी मोटर सायकलची रॅली काढून हाती भगवा ध्वज लहरला.व सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराजांची आदर्श शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेत महाराजांची वेषभूषा गौरव कावळे या युवकाने रंगवून धवल अश्वावर स्वार होऊन शोभायात्रेची रंगत वाढविली. आकाशात आतिषबाजी करण्यात आली. या शोभायात्रेत लहान मुलांनी हाती लेझीम नृत्य केले तर बस स्टँड चौकात चिमुकल्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर प्रकाश टाकला.गावामध्ये ठिकठिकाणी थंड पेय व नास्त्याचे आयोजन करण्यात आले होते. या शोभायात्रेत संपूर्ण गावातील समस्त नागरिकांनी सहभागी होत  मोठा जल्लोष साजरा केला सरतेशेवटी ईश्वर देशमुख सभागृह मध्ये सर्व शिव प्रेमींना अल्पोपाहार देऊन सांगता करण्यात आली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने