श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती घेरापालगड-किल्लेमाची येथे उत्साहात साजरी
खेड दि.२२(प्रतिनिधी अक्षय कदम):- खेड तालुक्यातील घेरापालगड ( किल्लेमाची) येथे,सालाबाद प्रमाणे ह्या वर्षीही,किल्ल्यावर रविवार दिनांक १९ फेब्रुवारी रोजी, छ्त्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव जल्लोषात साजरा झाला. किल्लेमाची ग्रामस्थ आणि मुंबई मंडळ व झोलाई स्पोर्ट यांनी संयुक्तपणे हा सोहळा पार पाडला. आलेल्या शिवभक्त, दुर्गप्रेमी आणि आजू बाजूच्या परिसरमधील लोकांच्या स्वागतासाठी जागोजागी लावलेल्या झेंडे आणि पताकांमुळे संपूर्ण परिसर शिवमय झालेला. छत्रपती शिवाजी महाराजांची मिरवणूक जल्लोषात आणि शिवगर्जना देत झाली. किल्ले माची ग्रामस्थ आणि मुंबई मंडळाने, पहाटे ५ वाजल्या पासून किल्यावरती शिवज्योत घेवून येणाऱ्या शिव भक्तांची स्वागताची पुरेपूर व्यवस्था केली होती. तसेच किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा अभिषेक, ध्वजा वंदन, लेझिम नृत्य करण्यात आले, ढोल ताशांच्या गजरात आलेल्या सर्व भाविकांनी मंत्रमुग्ध होवून सोहळ्याचा आनंद लुटला. किल्लेमाची ग्रामस्थ , मुंबई मंडळ आणि झोलई स्पोर्ट यांची मेहनत आणि प्रयत्नाने छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात आणि दिमाखात साजरी करण्यात आला . शिवछत्रपतींच्या जयंती उत्सव सोहळा साजरा व्हावा ह्या साठी अथक प्रयत्न आणि परिश्रम घेतलेल्या सर्व शिव भक्तांचे हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा.