विवाहातील अनिष्ट बाबी बंद कराव्यात : जयसिंग वाघ यांचे आवाहन

 विवाहातील अनिष्ट बाबी बंद कराव्यात : जयसिंग वाघ यांचे आवाहन

---------------------------------------------------


जळगाव,दि.०५(प्रतिनिधी) :
-  विवाहात आजही अनेक अनिष्ट चालिरिती , पैशाची उधळपट्टी , रुसवे , फुगवे सुरु असून विवाह पाच पाच तास उशीराने लावणे , मोठ्या प्रमाणात अन्नाची नासाडी करणे हे सर्व प्रकार बंद करावे असे स्पष्ट आवाहन प्रसिद्व साहित्यिक व विचारवंत जयसिंग वाघ यांनी केले .

      ' जाणीव परिवार ' तर्फे जळगाव येथे आयोजित १३ व्या बौद्ध वधु , वर , पालक परिचय मेळाव्यात अध्यक्ष स्थानावरुन भाषण करतांना वाघ बोलत होते . या प्रसंगी ९८ युवक , युवती यांनी आपला परिचय करुन दिला , चर्चेअन्ति ५ विवाह जुळविन्यात आले .

          जयसिंग वाघ यांनी पुढं आपल्या भाषणात सांगितले की आज सरकारी नौकरी एक दुर्मिळ बाब झाली आहे , आर्थिक स्तर कमी कमी होत आहे , शिक्षणाचे प्रमाण घटत आहे या बाबींचा विचार प्रत्येक मुला मूली ने तसेच पालकांनी करणे गरजेचे आहे ,  विनाकारण अवास्तव अपेक्षा ठेउ नये .

        कार्यक्रमाच्या सुरवातीस भगवान बुद्ध व बाबासाहेब आम्बेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन पूज्य भन्तेजी संघरत्न यांच्या हस्ते करण्यात आले , त्यांनी बुद्ध वंदना घेऊन मार्गदर्शन केले .

         मिलिंद केदार यांनी सुद्धा मार्गदर्शन करुन आदर्श विवाह घड़उन आणावे असे आवाहन केले ,  संयोजक युवराज वाघ यांनी प्रास्ताविक केले व बारा वर्षात किमान शंभर विवाह जुळविन्यात यश आले , या वर्षी चार राज्यांमधुन युवक युवति आल्या आहेत .

          कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रपति पुरस्कार प्राप्त पोलीस दिनकर अडकमोल , आभार जगदीश गाढ़े यांनी केले , मंचावर विश्वास बिरहाडे , उषा वाघ , गिरधर निकम , अनंत कोचुरे  होते , या प्रसंगी युवक  युवती यांची सूची प्रकाशित करण्यात आली .

         सुधा वाघ , राजू वारडे , श्रीकांत तायड़े , दिलीप तासखेड़कर , दिलीप सपकाले , नीलेश  सेंदाने , प्रमोद पाटील , शरद बिरहाडे , विजय म्हस्के  यांच्या सह नागरिक मोठ्या संखेने हजर होते . 



Post a Comment

थोडे नवीन जरा जुने