चोसाका अध्यक्षपदी चंद्रहास गुजराथी तर उपाध्यक्षपदी एस.बी.नाना पाटील यांची बिनविरोध निवड

 चोसाका अध्यक्षपदी चंद्रहास गुजराथी तर उपाध्यक्षपदी एस.बी.नाना पाटील यांची बिनविरोध निवड


चोपडा दि.२६(प्रतिनिधी): येथील चोपडा  शेतकरी सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक पार पडून अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवड प्रक्रिया चोपडा साखर कारखाना साइटवर दुपारी झाली. यावेळी अध्यक्षपदासाठी चंद्रहास नटवरलाल गुजराथी व नारायण शालीग्राम पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. मात्र नारायण पाटील यांनी माघार घेतल्याने चंद्रहास नटवरलाल गुजराथी यांची बिनविरोध निवड झाली. तर उपाध्यक्षपदी संजयकुमार भालचंद्र पाटील यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांचीही बिनविरोध निवड झाल्याचे जिल्हा उपनिबंधक तथा निवडणूक निर्णय  अधिकारी संतोष बीडवाई यांनी घोषित केले.

चंद्रहास गुजराथी यांना सूचक गोपाळ पाटील तर अनुमोदक ड. डी पी पाटील तर संजयकुमार पाटील यांना सूचक प्रशांत पाटील तर अनुमोदक शिवाजी देसले होते. यावेळी संचालक डॉ. सुरेश पाटील, दिनकर देशमुख, दिलीप धनगर, दत्तात्रय पाटील, डॉ अनिल पाटील, गोपाल धनगर, सुधाकर पाटील, पंडीत पाटील शिवाजी पाटील शशिकांत देवरे, मिनाक्षी सोनवणे, आशाबाई पवार, ज्ञानेश्वर भादले, शरद धनगर आदी उपस्थित होते. सहाय्यक निबंधक एस एफ गायकवाड, के. पी. पाटील, आधार पाटील, के.एन. पाटील आदींनी काम पाहिले.

या निवडीप्रसंगी चोपडा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक अॅड. घनश्याम पाटील अनुपस्थित होते. यावेळी माजी आमदार कैलास पाटील, उद्योजक सुनील जैन, माजी सभापती गोकुळ पाटील, जगन्नाथ पाटील, सूतगिरणी उपाध्यक्ष प्रल्हाद पाटील, माजी नगरसेवक जीवन चौधरी, हितेंद्र देशमुख, भुपेंद्र गुजराती, नंदकिशोर पाटील, राजेंद्र पाटील आदी उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने