अमळनेर न.पा.शाखा अभियंता वाघ कुटूंबिंयाचे चोपड्यात अनोखे दातृत्व..!
चि.मिथीलेश च्या वाढदिवशी माणुसकी चे दर्शन..! चोपडयात कमला नेहरू वसतीगृहास आटा चक्की भेट
चोपडा दि.२५(प्रतिनिधी):अमळनेर नगरपालिकेचे बांधकाम विभागाचे शाखा अभियंता श्री डिगंबर वाघ व पत्नी सौ कविता डिगंबर वाघ या दातृत्वशाली दाम्पत्याने आपला मुलगा चि.मिथिलेश चा वाढदिवस सह कुटुंब चोपडा येथील कमला नेहरू मागासवर्गीय मुलींचे वसतिगृहातील गोरं गरीब विद्यार्थींनीसोबत मिष्ठान्न भोजन व आटा चक्की देऊन आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा केला. आपल्या कष्टाच्या फळातील दोन घास दुसऱ्याला भरविले पाहिजेत या उदात्त हेतूने ते दरवर्षी आपल्या दोन्ही पाल्यांच्या वाढदिवस गरजू गरजवंत विद्यार्थ्यांची आवश्यक ती निकड शोधत त्यांचे अश्रु पुसण्यासाठी ते पुढे सरसावतात.त्यांच्या हा स्तूत्य उपक्रम पाहून विद्यार्थीनींनीसह परिसरातील जनता सुखावली.
खरं तर मानुसकीच्या दुष्काळात आपण वआपलं कुटुंब या व्यतिरिक्त काहीही न दिसणाऱ्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहे अशातच जगा आणि दुसऱ्याला जगू द्या..या स्वामी नरेंद्राचार्यांच्या संदेशाप्रमाणे जगणाऱ्या महान हृदयाच्या व्यक्तींही काही कमी नाहीत त्यातील "वाघ कुटूंब" हे एक आहे. ते दरवर्षी शिर्डी येथील आश्रमात निकडवंत आदिवासी विद्यार्थ्यांना मदतीचा हात देतात त्याच भाग म्हणून त्यांनी चि.मिथिलेशचा वाढदिवस चोपडा येथे आदिवासी विद्यार्थीनीं सोबत साजरा करून गरिब विद्यार्थीनीच्या चेहऱ्यावर हास्य खुलविले. यावेळी त्यांच्या पत्नी सौ.कविता डिगंबर वाघ, वसतीगृह अध्यक्ष महेश शिरसाठ,अधिक्षिका कावेरी कोळी,कु.ईशिता वाघ व विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.