महाजन इंग्लिश क्लासेस विद्यार्थ्यांची इंग्रजी ऑल्मपियाड परिक्षेत उत्तुंग भरारी

 महाजन इंग्लिश क्लासेस विद्यार्थ्यांची इंग्रजी ऑल्मपियाड परिक्षेत उत्तुंग भरारी


चोपडा दि.२३(प्रतिनिधी):येथील महाजन इंग्लिश क्लासेस विद्यार्थी डिसेंबर महिन्यात घेण्यात आलेल्या इंग्लिश ऑल्मपियाड परिक्षेत एक मोठी झेप घेवून जळगाव जिल्ह्यातून गोल्ड मेडल मिळवत प्रथम येण्याचा मान मिळविला आहे.
  गेल्या काम १८ वर्षापासुन चोपडा शिक्षण नगरीत श्री दिपक महाजन सर ज्ञान दानाचे काम करीत असून त्यांचे क्लासेसचे विद्यार्थी चि. संचित दिवाकर बडगुजर,
कु.. स्वरा विमित हरताळकर कु. जैनव जावेद तडवी,
कु. हेमांगी अहिरे,कु. केनिया चंद्रकांत महाजन, कु. रूपल लक्ष्मण महाजन चि. आर्यन दिपक पाटील , निसर्ग योगेश सोनवणे यांनी इंग्रजी ऑल्मपियाड परिक्षेत  उत्तुंग यश प्राप्त करत आपली चुणूक दाखवली आहे
इयत्ता १० वी व जीएसटी  परिक्षेत देखील नाशिक विभागातून चांगली कामगिरी दाखविण्यात  महाजन क्लासेसचे विद्यार्थी अग्रेसर असतात त्यामुळे पालकांकडून महाजन सोबत विद्यार्थ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने