*भोर टाऊनशिप, जाधव संकुल आणि म्हाडा कॉलनी परिसरात प्रजासत्ताक दिन साजरा
नाशिक दि.२९(प्रतिनिधी) भोर टाऊनशिप, जाधव संकुल आणि म्हाडा कॉलनी परिसर अंबड-सातपूर लिंकरोड, चुंचाळे शिवार येथील मातोश्री लक्ष्मीबाई बाळू भोर प्राथमिक विद्या मंदिर आणि माध्यमिक विद्यालयात 26 जानेवारी रोजी संपन्न झालेल्या प्रजासत्ताक दिनी मोठ्या थाटामाटात पारंपारिक पद्धतीने साजरा करण्यात आला.
प्रथम सर्व विद्यार्थ्यांची संपूर्ण परिसरातून प्रभातफेरी विवीध घोषणांच्या गजरांनी परिसर दणाणून सोडला आणि नंतर ठिक सकाळी 07.30 वाजता शाळेचे व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मा. श्री. नामदेवदादा भोर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र शिक्षण विस्ताराचे सचिव मा.श्री.बाळासाहेब ढोबळे, समाजसेविका, भाजपाच्या सदस्या, सामान्य कार्यकर्त्या मा.सौ. धनश्रीताई नेवरे (सैंदाणे),कोळी महासंघाचे नाशिक शहर संपर्क प्रमुख तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे नाशिक शहर उपाध्यक्ष मा. श्री. युवराज सैंदाणे उपस्थित होते. ध्वजारोहण झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी देशभक्ती वर सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले, त्यात मुख्यतः कवायत, देशभक्ती गिते सादर करण्यात आले. त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धेत भाग घेणा-या विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण मान्यावरांच्या हस्ते करण्यात आला. त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना सामाजिक कार्यकर्त्या मा.सौ. धनश्रीताई नेवरे (सैंदाणे) यांच्या मार्फत चाँकलेट वाटप करण्यात आले, तसेच त्यांच्या कडून शाळेच्या प्रांगणात सावली असावी म्हणून निंब या झाडांची रोपे देण्यात आली. या प्रसंगी माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका मा.श्रीमती प्रियंकाताई हासे मॅडम, प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक मा.श्री.बाबासाहेब खैरनार, आदर्श शिक्षीका मा.श्रीमती वत्सला रडे (भोळे) मॅडम, जेष्ठ नेते मा.श्री.यशवंतभाऊ पवार, मा. श्री. अशोकभाऊ जाधव, सेवानिवृत्त शिक्षक मा.श्री.नागराज माळी सर. मा.श्री. प्रकाशभाऊ शिरसाठ आदी उपस्थित होते.