नॉर्वे येथील शिक्षणतज्ञांची चोपडा महाविद्यालयास भेट’

 *'नॉर्वे येथील शिक्षणतज्ञांची चोपडा महाविद्यालयास भेट’*


चोपडादि.२९(प्रतिनिधी): येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित, कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यालयाच्या इंग्रजी विभागाद्वारे श्री. मोर्टन स्वेन्न्बी यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी नॉर्वे येथील ५ शिक्षण तज्ञांची टीम कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होती. कार्यक्रमाचे उदघाटन श्रीमती. विनी गुलब्रांडसन (निवृत्त वैद्यकीय व्यावसायिक) यांच्या हस्ते करण्यात आले.  

      याप्रसंगी इंग्रजी विभागप्रमुख प्रा. दीनानाथ पाटील यांनी प्रस्ताविकेतून संस्थेच्या व महाविद्याल याच्या प्रगतीचा आलेख विषद केला तसेच महाविद्यालयाद्वारे कार्यरत विद्यार्थीकेंद्रित उपक्रमांविषयी माहिती दिली. यांनतर कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक श्री. मोर्टन स्वेन्न्बी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना जीवनविषयक नैतिक मूल्ल्यांबदल आग्रही राहण्याचा सल्ला विद्यार्थ्यांना दिला व एकूण शिक्षण प्रक्रियेच्या ठळक उद्दीष्ठांप्रती माहिती दिली तसेच गुणवत्ता पूर्वक शिक्षणाचे महत्व विषद केले. 

  या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.डॉ.के.एन.सोनवणे उपस्थित होते. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमती. लैला वीक, श्रीमती. अँना मरीथ, श्री. लाईफ वीक, मेमोसा हायस्कूलचे अध्यक्ष श्री.विजय सपकाळे व मेमोसा हायस्कूलचे सचिव श्रीमती.नीलम सपकाळे तसेच डॉ.सुरेश जी.पाटील नर्सिंग महाविद्यालयाच्या प्राचार्या सौ.करुणा चंदनशिव हे व्यासपीठावर उपस्थित होते.

        या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन इंग्रजी विभाग प्रमुख श्री.दिनानाथ पाटील यांनी केले तर आभार श्री.डी.पी.सपकाळे यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री.व्ही.जी.दारूंटे, श्री.वाय.एन.पाटील, श्री.एस.व्ही.सूर्यवंशी, सौ.आर.एस.साळुंखे व कु.पी.डी.पाटील आदींनी परिश्रम घेतले.

      या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने