कृषिदूतांकडून गणपूरच्या ऍड पाटील यांच्या कृषी कार्याची दखल

 कृषिदूतांकडून गणपूरच्या ऍड पाटील यांच्या कृषी कार्याची दखल     

गणपूर(ता चोपडा)शेतीमित्र ऍड.बाळकृष्ण पाटील यांच्याकडून अनुभव जाणुन घेतांना विद्यार्थी

 गणपूर (ता.चोपडा)ता 8: येथे ग्रामीण कृषि कार्यानुभव व कृषि औद्योगिक प्रशिक्षण योजनेंतर्गत आलेल्या धुळ्याच्या कृषी महाविद्यालायाच्या  कृषिदुतांनी शासकीय पुरस्कार प्राप्त शेतकरी संघाचे राज्य कार्यकारिणी सदस्य तथा महाराष्ट्र शासनाचा 'शेतीमित्र' तसेच  राज्य ऊस उत्पादक संघाचा 'महाराष्ट्र ऊस भुषण' पुरस्कार प्राप्त ॲड.बाळकृष्ण पौलाद पाटील  यांच्या यशस्वी कारकीर्दीची दखल घेतली.              ऍड पाटील यांनी गेल्या 35 वर्षात पत्रकारितेच्या माध्यमातून केलेले काम खानदेशातील शेतकऱ्यांच्या यशोगाथा व प्रत्यक्ष शेतीवरचे अनुभव यावेळी विद्यार्थ्यांना कथन केले.हे विद्यार्थी दहाआठवड्यात विविध कृषी अनुभव येथे घेत असुन त्यांना यासाठी कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता  डाॅ.सी.डी.देवकर , कार्यक्रमाचे समन्वयक डाॅ.संदिप पाटील , चेअरमन डाॅ.पी.एन.शेंडगे , सहयोगी अधिष्ठाता प्रतिनिधी डाॅ.एस.डी.पाटील , कार्यक्रम अधिकारी डाॅ.एस.पी.पौळ  व वरिष्ठ विषयतज्ञांकडुन मार्गदर्शन लाभले आहे. ........

.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने