कै.हि मो करोडपती माध्यमिक विद्यालय चोपडा येथे बालिका दिन साजरा

कै.हि मो करोडपती माध्यमिक विद्यालय चोपडा येथे बालिका दिन साजरा


चोपडा दि.०३(प्रतिनिधी):   आज दिनांक 3 जानेवारी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त कै.हि .मो .करोडपती  माध्यमिक विद्यालय चोपडा येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. ज्यात स्त्री शिक्षणाचे महत्व सांगणारे "मी सावित्री बाई फुले बोलतेय "एक उत्कृष्ट एकपात्री विद्यार्थ्यांनी कु. रोशनी बारेला हिने सादर केले,विविध स्पर्धा संगीत खुर्ची, गोणपाट व निंबु चमचा  इ.स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. श्री.एम आर भोईटे सरानी सुत्र संचलन केले तसेच विद्यार्थ्यांनकडून स्वतः प्रचंड मेहनत घेत सर्वेच कार्यक्रम,विद्यार्थी, शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या सर्व्यांच्या सहकार्याने यशस्वीपणे पार पाडले,

विद्यालयातील उपक्रमशील शिक्षिका  श्रीमती.पी सी बडगुजर मॅडम यांनी फलक लेखन केले.,तसेच बालिका दिनानिमित्त विद्यार्थिनीचा सत्कार विद्यालयातील जेष्ठ  शिक्षक श्री. आर आर बडगुजर सर श्री ए पी बडगुजर, श्रीमती व्ही.बी साळुंखे मॅडम, सी पी बडगुजर मॅडम, पी सी बडगुजर मॅडम, एस टी बोरसे मॅडम, संजोग साळुंखे, अशोक बडगुजर,सुनील बडगुजर यांनी केले.आजच्या बालिका दिनानिमित्त क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन तसेच माल्यार्पण विद्यालयातील मुख्याध्यापक श्री.डी व्ही. बाविस्कर सर  सर यांनी केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने