चोपडा फार्मसी कॉलेज द्वितीय वर्ष विद्यार्थ्यांचे घवघवीत यश


 चोपडा फार्मसी कॉलेज द्वितीय वर्ष विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

चोपडा दि.२४ (प्रतिनिधी):  श्रीमती शरदचंद्र सुरेश पाटील कॉलेज ऑफ फार्मसी चोपडा येथील द्वितीय वर्ष फार्मसी विद्यार्थी अविनाश गोकुळ पाटील याने श्री विलेपार्ले केळवाणी मंडळ द्वारा आयोजित शिरपूर येथे संपन्न झालेल्या लॉन टेनिस स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त केला.

अविनाश गोकुळ पाटील या द्वितीय वर्ष बी फार्मसी विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष माननीय अँड भैय्यासाहेब संदीप सुरेश पाटील संस्थेचे सचिव माननीय डॉ ताईसाहेब स्मिता संदीप पाटील तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ गौतम प्रकाश चंद्र वडनेरे व क्रीडा शिक्षक प्रा अतुल साबे व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने