शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त विविध कार्यक्रम
शिरपूर दि.२४(प्रतिनिधी):*हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त शिवसेना शाखा बोराळे तर्फे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले.प्रथम शिवसेना शाखा प्रमुख भरत सिंग राजपूत यांनी हिंदू हृदय सम्राट सरसेनापती शिवसेनाप्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला माल्यार्पन केले शाखा सचिव प्रदीप वानखेडे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपशाखा प्रमुख तुषार राजपूत शाखा संघटक अमीत राजपूत यांनी मार्गदर्शन पर भाषणात म्हटले की येणार्या ग्राम पंचायत निवडणुकीत शाखा प्रमुख भरत सिंग राजपूत यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे उमेदवार व सरपंच असे एकहाती सत्ता स्थापन करण्यात येईल अशी प्रतिक्रिया दिली तर शेवटी आभार माजी ग्राम पंचायत सदस्य मोना राजपूत यांनी मानले सदर कार्यक्रमाला बोराळे नगरीतील ग्राम पंचायत सदस्य रवींद्र वानखेडे, सुहास वानखेडे, लखन राजपूत,दिपक वानखेडे, नेमिचंद पाटील,हिंमतसिंग राजपूत, सुमित राजपूत,पूनमसिंग राजपूत, विनोद चौधरी, विनोद चौहान, कल्पेश राजपूत, सह सर्व शिवसैनिक व पदाधिकारी शिवसेना कार्यालयात शिवसेना, युवा सेना,महिला आघाडी , माजी सरपंच, माजी ग्राम पंचायत सदस्य,विकासो संचालक सर्व शिवसैनिक ग्रामस्थ उपस्थित होते *