चोपड्याच्या ॲड.किशोरी नेवेंचा कल्याणच्या समारंभात सत्कार
चोपडा,दि.१०(प्रतिनिधी) - येथील रहिवासी ॲड.किशोरी सागर नेवे यांचा बी ए एल एल बी ची परिक्षा उत्तम गुणांनी प्रथम येत उतिर्ण केल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
कल्याण येथे झालेल्या नेवेवाणी समाज विकास प्रतिष्ठान कल्याण व मुंबई परिसर संस्थेच्या ३६ व्या वर्धापन दिन सोहळ्यात ॲड.किशोरी नेवे यांचा प्रतिथयश विधिज्ञ ॲड. प्रकाश साळशिंगीकर यांनी त्यांचे वडिल स्व.जगन्नाथ त्र्यंबक साळशिंगीकर यांच्या स्मरणार्थ दिलेला पुरस्कार सौ.शिल्पा ललित नेवे (दहिसर) यांच्या हस्ते देवून सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुधीर नेवे(भुसावळ) होते.तर यावेळी नेवेवाणी समाज विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुनिल नेवे,सरचिटणीस संजीव वाणी,कार्यकारणी सदस्य,अशोक नेवे, विद्या नेवे,सागर नेवे आदि दिसत आहेत.ॲड किशोरी नेवे ह्या पत्रकार श्रीकांत नेवे व भाजपच्या जिल्हा चिटणीस रंजना नेवे यांच्या स्नुषा आहेत.