रोटरी तर्फे पंकज महाविद्यालयातील विद्यार्थीनींना सॅनेटरी पॅड मशीनचे वाटप...

 रोटरी तर्फे पंकज महाविद्यालयातील विद्यार्थीनींना सॅनेटरी पॅड मशीनचे वाटप...


 चोपडा,दि.२२ (प्रतिनिधी) :---शहरांतील पंकज महाविद्यालयातील  विद्यार्थिनींना रोटरी क्लब ऑफ चोपडा तर्फे  सॅनेटरी पॅड मशीनचे वाटप करण्यात आले. सदर मशीन मध्ये ५ रुपयांचे नाणे टाकल्यावर तात्काळ   सॅनेटरी पॅड उपलब्ध होणार आहे.

   रोटरी क्लब चोपडाचे अध्यक्ष ॲड रुपेश पाटील आपल्या प्रास्ताविकात म्हणाले की ,मासिक पाळी संदर्भात समाजमनामध्ये अनेक समज व गैरसमज आहेत ते घालवणे काळाची गरज असून विद्यार्थिनींमध्ये मासिक पाळी संदर्भात सकारात्मक  विचारांची पेरणी करणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. महाविद्यालयीन विद्यार्थीनींना कॉलेज कामकाजाच्या दरम्यान तात्काळ सॅनेटरी पॅड उपलब्ध व्हावेत हि भूमिका ठेवून प्रकल्प प्रमुख संध्या महाजन यांनी सदर मशीन उपलब्ध करून द्यावे अशी भूमिका मांडली असल्याचे ते म्हणाले.

    सदर सॅनेटरी पॅड मशीन पंकज महाविद्यालयाच्या प्राध्यापिका डॉ नंदिनी वाघ यांच्या ताब्यात देण्यात आले. त्यावेळी पंकज शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे अध्यक्ष डॉ सुरेश बोरोले , महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. आर आर अत्तरदे, सौ.दिपाली बोरोले उपस्थित होते.

  कार्यक्रमाला रोटरी अध्यक्ष ॲड रुपेश पाटील, सचिव गौरव महाले ,प्रकल्प प्रमुख संध्या महाजन, पंकज बोरोले ,चेतन टाटिया ,सुरेखा मिस्त्री, विजय पाटील ,पृथ्वीराज राजपूत ,स्वप्नील महाजन आदी रोटेरियन उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने