बाम्हणे येथे 43 वे शिंदखेडा तालुका विज्ञान प्रदर्शनाचा पारितोषिक वितरण समारंभ संपन्न


 बाम्हणे येथे 43 वे शिंदखेडा तालुका विज्ञान प्रदर्शनाचा पारितोषिक वितरण समारंभ संपन्न

 शिंदखेडा,दि.२२(प्रतिनिधी) तालुक्यातील बाम्हणे येथे 43 व्या तालुका विज्ञान प्रदर्शनाचा पारितोषिक वितरण समारंभ धुळे जिल्हा वेतन अधीक्षक श्रीमती मीनाक्षी गिरी यांच्या हस्ते पार पडला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी स्वधारक विद्यार्थी संस्थेच्या सचिव श्री सी एन राजपूत हे होते कार्यक्रम प्रसंगी सह गटविकास अधिकारी श्रीमती भावना पाटील जिल्हा विज्ञान संघाचे अध्यक्ष श्री पी झेड कुवर शिंदखेडा तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष श्री एस ए कदम तालुका विज्ञान संघाचे अध्यक्ष श्री आर ए चित्ते शाळेचे मुख्याध्यापक श्री बी एस निकम आदी मान्यवर उपस्थित होते

    कार्यक्रम प्रसंगी पारितोषिक वितरणात प्राथमिक गट (1 ते 8) यात प्रथम- दिनेश ईश्वर परदेशी साने गुरुजी माध्यमिक विद्यालय अजंदे (झटपट आकृती गणन) द्वितीय - सादिया शेख रहीम अंगलो उर्दू हायस्कूल शिंदखेडा( इको फ्रेंडली सोसायटी) तृतीय- दीपा संजय चौधरी डी आर बी ओ डी हायस्कूल दोंडाईचा( पुनरुत्पादन ब्रेक सिस्टीम )उत्तेजनार्थ गणेश अनिल पाटील सरकार साहेब रावल माध्यमिक विद्यालय बाम्हणे तर माध्यमिक गटातून प्रथम- विशाल बापू पाटील आर डी एम पी हायस्कूल दोंडाईचा (बोंड आळी रासायनिक नियंत्रण )द्वितीय- निमिषा नितीन खडसे नूतन ज्युनियर कॉलेज दोंडाईचा( ट्रान्सपोर्ट अँड इनोव्हेशन )तृतीय - गणेश अशोक कोळी ओ एम रुपनर हायस्कूल बाभळे (सैन्यासाठी सुरक्षा यंत्र )उत्तेजनार्थ चेतन रामराव पाटील आस्तिक मुनी माध्यमिक विद्यालय कलमाडी तसेच प्राथमिक शिक्षक गट शैक्षणिक साहित्य निर्मिती यातून प्रथम श्री दिनेश गुलाबराव धनगर जिल्हा परिषद शाळा वरपाडे (मनोरंजक गणित) द्वितीय श्री महेश अशोक बाविस्कर गुरुदत्त हायस्कूल वायपूर( गणित विज्ञान संकल्पना स्पष्ट करणे) माध्यमिक गटातून शैक्षणिक साहित्य निर्मितीत प्रथम राजेंद्र भटू पाटील नूतन माध्यमिक विद्यालय दराने रोहाणे (प्रकाशियपेटी ) द्वितीय भूषण गोविंद दीक्षित हस्ती पब्लिक स्कूल दोंडाईचा (प्ले विथ पीरियॉडिक टेबल )तर प्रयोगशाळा परिचर गटातून श्री विजय मधुकर चौधरी हस्ती स्कूल दोंडाईचा (सायन्स मॉडेल) यांना अनुक्रमे क्रमांक मिळवले.

   सदर कार्यक्रम प्रसंगी जिल्हा विज्ञान उपक्रम प्रमुख संजय गोसावी जिल्हा उपाध्यक्ष श्री एस एन पाटील सचिव श्री सुधाकर माळी तालुका उपाध्यक्ष श्री ए टी पाटील  श्री एन एम पाटील कार्याध्यक्ष श्री जे डी भदाणे श्री पी आर पाटील मुख्याध्यापक श्री पी पी देवरे श्री एस आर पाटील श्री अरविंद माळी उपस्थित होते 

   तसेच तज्ञ परीक्षक म्हणून प्राथमिक गटात श्री अरविंद माळी श्री जे डी भदाने श्री वाय आर  देसले त्यांनी तर माध्यमिक गटातून श्री निलेश मालपुरकर श्री एन पी भिलाने श्री डी पी देवरे यांनी काम पाहिले तसेच विश्वेश दिनानाथ पाटील या विद्यार्थीने विद्यार्थीमनोगत तर श्री ए टी पाटील यांनी शिक्षक मनोगत व्यक्त केले विज्ञान संघाचे अध्यक्ष श्री आर ए चित्ते यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना  तर सूत्रसंचालन श्री देवरे सर यांनी केले . मान्यवरांचे आभार मुख्याध्यापक श्री भूपेंद्र निकम यांनी मानले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने