मिमोसा इंग्लिश स्कूलचा सांस्कृतिक सोहळा उत्साहात संपन्न.*

 मिमोसा इंग्लिश स्कूलचा सांस्कृतिक सोहळा उत्साहात संपन्न

*चोपडादि.१५(प्रतिनिधी):-* शहरातील मिमोसा/क्लारा इंग्लिश मिडीयम स्कूलचा सांस्कृतिक कलादर्शन व गुणगौरव सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी न.प.चे मुख्याधिकारी हेमंत निकम हे होते. प्रमुख अतिथी म्हणुन ग.स.चे शाखाधिकारी जगन्नाथ बाविस्कर, जि.प. सदस्य गजेंद्र सोनवणे यांची विशेष उपस्थिती होती. 

प्रारंभी मान्यवरांच्या शुभहस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले.विद्यार्थीनींनी ईशस्तवन व स्वागत गीत सादर केले. यावेळी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी मान्यवरांचे यथोचित स्वागत व सत्कार केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष स्टिफन सपकाळे यांनी केले. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध कला सादर करून सर्वांची मने जिंकलीत. मान्यवरांनी आपल्या भाषणात संस्थेच्या कार्याविषयी गौरवोद्गार काढुन आदिवासी मुलांच्या कलागुणांचे कौतुकही केले. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षिसेही देण्यात आलीत.

        याप्रसंगी सामा.कार्यकर्ते वैभवराज बाविस्कर, प्रमोद हिवाळे, निलेश सपकाळे, दयाराम ब्राह्मणे, सिसिल सपकाळे, प्राथ. मुख्याध्यापिका वेरोनिका सुर्यवंशी, माध्य. मुख्याध्यापिका निलिमा मॅथ्यू यांचेसह विद्यार्थ्यांचे पालक मोठ्या संख्येने हजर होते.

    कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक मनोज वाघ, अनुराधा ठाकरे, स्वप्नाली बोरसे, कविता शिंदे यांनी केले. आभारप्रदर्शन संस्थेचे समन्वयक सिसिल सपकाळे यांनी केले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने