अमळनेर... चोपडा रेल्वे मार्ग सर्वेक्षणाबद्दल चोपड्यात आनंद
चोपडा..दि. १७(प्रतिनिधी) नुकताच अमळनेर चोपडा ह्या छत्तीस किमी रेल्वे मार्ग उभारणी संदर्भात केंद्र सरकारच्या रेल्वे मंत्रालय तर्फे एका पथकामार्फत नुकतेच सर्वेक्षण करण्यात आले व लवकरात लवकर हा मार्ग उभारण्यात येणार आहे, याबाबत चोपडेकरांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत... गेली सहा दशके खान्देश विभागात जळगांव जिल्ह्यातील पंधरा तालुक्यापैकी फक्त चोपडा हा एकमेव तालुका रेल्वे मार्गाने जोडला नसल्याने तालुक्यातील पाहिजे तशी सर्वांगिण प्रगती झाली नाही... युवकांना बेरोजगारीचा प्रश्न, शेतकरी व उद्योग क्षेत्रात कार्यरत अनेक समस्यांचे प्रश्न त्यामुळे निकाली लागेल, तसेच मध्यप्रदेश, गुजरात, व राजस्थान या तीन राज्यातील व्यापारी व सामाजिक व सांस्कृतिक आदानप्रदान मोठ्या प्रमाणात वाढीस लागेल ,असा आत्मविश्वास तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकार व या रेल्वे साठी मागणी कर्ते श्री. अनिलकुमार पालीवाल यांनी बोलताना व्यक्त केला तालुक्यातील ईतरही अनेक राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते व संस्था चालक यांनी या रेल्वे मार्ग उभारणी संदर्भात रेल्वे मंत्रालय व केंद्र सरकारच्या या सर्वेक्षण बाबतीत आनंद व्यक्त केला आहे व लवकरात लवकर अमळनेर चोपडा रेल्वे मार्ग उभारणी काम सुरु करण्यात यावे, अशी मागणी केली आहे.