*प्रताप विद्या मंदिराची शालेय शासकीय मैदानी क्रीडा स्पर्धेत विभागीय स्तरावर उत्तुंग भरारी.......*
चोपडा दि.17( प्रतिनिधी) जळगाव जिल्हा येथे छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलात गेल्या दोन दिवसांपासून जिल्हास्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आलेले असून, सदर स्पर्धेमध्ये प्रताप विद्यामंदिर चोपडा येथील खेळाडूंनी घवघवीत यश संपादन करून विभाग स्तरावर मजल मारली.यात 14वर्षे आतील वयोगटात ज्ञानेश्वरी वासुदेव कोळी इ.8वी या विद्यार्थिनीने जिल्हास्तरावर गोळाफेक या खेळ प्रकारात प्रथम क्रमांक पटकाविला,तसेच खुशी दीपक माळी इ.11वी हीने गोळाफेक खेळ प्रकारात व थाळीफेक खेळ प्रकारात जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक पटकाविला, तर उमंग अनिल सोनवणे 11वी या खेळाडूने 110 मीटर हर्डल्स या खेळ प्रकारात जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक पटकाविला.तसेच प्रथमेश साहेबराव महाजन 11वी या खेळाडूने हातोडाफेक खेळ प्रकारात जिल्हास्तरावर तृतीय,श्लोक संदीप मराठे 10वी याने उंच उडीत जिल्हास्तरावर तृतीय तर प्रज्ञा विनायक महाजन 11वी हिने हातोडा फेक खेळ प्रकारात तृतीय क्रमांक पटकावले.सर्वच खेळाडूंनी विद्यालयासाठी भरीव अशी कामगिरी करत विद्यालयाच्या शिरपेचात मानाचे तुरे रोवले. जिल्हास्तरावर प्रथम व द्वितीय आलेले हे खेळाडू जळगाव जिल्हा ग्रामीणचे नेतृत्व 15 तारखेपासून नाशिक येथे होणाऱ्या स्पर्धेमध्ये करतील. सदर सर्व खेळाडूंना प्रताप विद्या मंदिराचे क्रीडा विभाग प्रमुख श्री.एस.एस.पाटील व क्रीडाशिक्षक नरेंद्र एन.महाजन यांचे मार्गदर्शन लाभले.
विजय झालेल्या सर्व खेळाडू विद्यार्थ्यांचे संस्थेचे चेअरमन राजाभाई मयूर,अध्यक्षा शैलाबेन मयूर,उपाध्यक्ष विश्वनाथजी अग्रवाल, संस्थेच्या सचिव माधुरीताई मयूर, सदस्य चंद्रहासभाई गुजराथी,भूपेंद्रभाई गुजराथी,संस्थेचे समन्वयक गोविंद गुजराथी तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रशांतभाई गुजराथी,उपमुख्याध्यापक एस.जी.डोंगरे,उच्चमाध्यमिक विभागाचे उपप्राचार्य जे.एस.शेलार पर्यवेक्षिका माधुरी पाटील, पर्यवेक्षक पी.डी.पाटील यांच्यासह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी यांनी भरभरून कौतुक केले.