नागलवाडी येथे सुतगिरणी बचाव पॅनल ला जोरदार प्रतिसाद
======================
चोपडा दि.१७(प्रतिनिधी):*आज दि १७ डिसेंबर रोजी नुकत्याच होऊ घातलेल्या तापी शेतकरी सहकारी सुतगिरणीच्या पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुक २०२२ च्या प्रचार दौरा निमित्त तालुक्यातील नागलवाडी येथे सुतगिरणी बचाव पॅनल चे उमेदवारांचे स्वागत करण्यात आले व विजयी आशिर्वाद मतदारांनी दिलेत सुतगिरणी बचाव पॅनल च्या उमेदवारांनी अगदी घरोघरी जाऊन प्रचार केला फेस टु फेस प्रचार करत असल्याने आपला विजय निश्चित आहे असा सुर मतदार राजाच्या तोंडुन ऐकायला मिळत आहे.
या वेळेस उपस्थित सुतगिरणी बचाव चे सर्व उमेदवार जेष्ठ नेते नागलवाडीतील जेष्ठ मतदाता गावाचे माजी सरपंच व सुतगिरणीचे माजी संचालक गोपाल गबा पाटील उपसरपंच सचिन पाटील. नितिन राजपुत योगेश पाटील. मोहन सुरसिंग पाटील. धोंडु पाटील. धर्मदास पाटील. वसंत महाजन. पुंडलिक पाटील. डाॅ पी एन महाजन. या सह गावातील मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते*