शिक्षक पालक सहविचार सभा संपन्न
पाचोरा दि.२१ (प्रतिनिधी राजेंद्र खैरनार )दिनांक 20/12/22 रोजी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी व गुणवत्ता वाढीसाठी... शैक्षणिक वर्ष 2022,,2023 शिक्षक पालक सहविचार सभेचे आयोजन माझा मुलगा कु.अनुभव खैरनार च्या शाळेत..न्यु कै.पि. के.शिंदे माध्यमिक विद्यालय, पुनगाव रोड पाचोरा येथे घेण्यात आले... त्यात कोरोना काळातील मुलांचे शैक्षणिक नुकसान कसे भरून काढता येईल व मुलांची गुणवत्ता पातळी कशी वाढवता येणार याविषयी सविस्तर चर्चा मुख्याध्यापक व वर्ग शिक्षक, पालक यांच्यात झाली...कोरोना काळात ऑनलाईन, क्लास घेऊन शिक्षण दिले गेले परंतु मोबाईल मुळे बऱ्याच अडचणीनां शिक्षक, पालक व विध्यार्थीनां सामोरे जावे लागले व कोरोना काळात सोशल डिस्टंशीचे नियमानुसार मदत पण झाली,हे एवढेच सत्य... मुख्याध्यापक गिते सरांनी सांगितलं ऑनलाईन मध्ये ज्यांना अडचणी येत असतील त्यांनी शाळेच्या वेळेपूर्वी येऊन त्या विषयावर येणारे समस्या सोडवून शैक्षणिक पातळी वाढवावी ... घरी दिला जाणारा होमवर्क कसा तपासला जातो याविषयी वर्गशिक्षिका सौ.हेमांगी काटकर मॅडमांनी पालकांची सविस्तर माहिती घेतली.. तसेच,,,मुख्याध्यापक श्री गिते सरांनी,, खाजगी ट्युशन कडे न जाता पालकांनी आपल्या पाल्यानां दररोज दोन तास प्रत्येक विषयांवर अभ्यास करून घेतला तर नक्कीच मुलांची प्रगती होईल... व त्यांचे वय खेळण्याचेपण आहे त्यांची शारीरीक आरोग्यावर पण लक्ष दिले पाहिजे,, प्राथमिक शिक्षण हे उच्च शिक्षणासाठी उत्तर पाया असतो,,,इ.विषयावर मार्गदर्शन केले, शाळेत पेक्षा मुले घरी जास्त वेळ असतात त्यामुळे पालकांनी मुलांकडून अभ्यास करून घेतला पाहिजे.. मुख्याध्यापक यांनी प्रत्येक वर्गनुसार वेगवेगळ्या वेळेत पालकांना सहामाही परीक्षेचा निकाल व मिळालेले गुण व विध्यार्थीची गुणवत्ता पातळी दाखवून चर्चा केली... सविस्तर मार्गदर्शन मुख्याध्यापक यांनी केले. व शेवटी श्री आबा पाटील सरांनी आभार मानून सभेची सांगता करण्यात आली..