आंतरराष्ट्रीय मुंबई बिनाले चित्र प्रदर्शनात प्राचार्य महाजन यांच्या चित्राची निवड
चोपडा दि.२१(प्रतिनिधी)-के.आर. इंटरनॅशनल एक्सचेंज असोसिएशन, इको सेंटर, चेन्नई आणि सर जे.जे.स्कूल ऑफ आर्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच दक्षिण कोरियन कॉन्सुलेट यांच्या सहयोगाने मुंबई बिनालेचे (द्वैवार्षिकी)चित्रप्रदर्शंनाचे नुकतेच टीव्हीएस उद्योग समूहाच्या अध्यक्षा वेणू श्रीनिवासन,अंगूक झेन सेंटरच्या संचालक सुबूल सुनिम,दक्षिण कोरियाच्या काॅंसुल जनरल किम युम,बुसान मेट्रोपोलियन कार्पोरेशनचे किम यंग हॉक,के.आर.इंटरनॅशनल एक्सचेंजच्या अध्यक्षा मॅडम हो सुक आणि सर जे.जे.स्कूल ऑफ आर्ट चे अधिष्ठाता तथा महाराष्ट्राचे कला संचालक प्रो.विश्वनाथ साबळे यांच्या उपस्थित संपन्न झाले.
या प्रदर्शनामध्ये १४५ दक्षिण कोरियन तर महाराष्ट्रातील ९० नामवंत कलावंतांच्या कलाकृती आहेत.त्यात चोपडा येथील भगिनी मंडळ संचलित ललित कला केंद्र या कला संस्थेचे प्राचार्य राजेंद्र महाजन यांची कलाकृती प्रदर्शित झालेली आहे.या कला प्रदर्शनीमध्ये नामवंत चित्रकार सुहास बहुलकर,अनिल नाईक,अखिलेश,राजेंद्र पाटील, श्रीकांत कदम,देवदत्त पाडेकर, प्रफुल्ल सावंत या दिग्गजांच्या पंक्तीत प्राचार्य महाजन यांचे चित्र निवडले गेले हे खानदेश साठी अभिमानाचे आहे.
या यशाबद्दल माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी,भगिनी मंडळाच्या अध्यक्षा पूनम गुजराथी, सचिव अश्विनी गुजराथी, उपप्राचार्य प्रा.डॉ.आशिष गुजराथी, प्राचार्य डॉ.सुरेश अलिझाड इ. मान्यवरांनी अभिनंदन केलेले आहे.
हे चित्र प्रदर्शन 30 डिसेंबर पर्यंत सर जे.जे.स्कूल ऑफ आर्ट,मुंबई येथे सर्वांसाठी विनामूल्य खुले आहे.