चोपडा महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची आयसीआयसीआय बँकेत निवड

 चोपडा महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची आयसीआयसीआय बँकेत निवड


चोपडा,दि.२८(प्रतिनिधी):येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यालयातील ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलतर्फे एनआयटी व आयसीआयसीआय बँक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'रोजगार मेळाव्यामध्ये महाविद्यालयातील ७० विद्यार्थी सहभागी झाले होते. यातून १० विद्यार्थ्यांची निवड आयसीआयसी बँक मध्ये असिस्टंट मॅनेजर म्हणून करण्यात आली.यामध्ये महाविद्यालयातील सरला राजेंद्र बडगुजर, सुहानी दिनकर धनगर, धनश्री सतीश बोरसे, गायत्री प्रभाकर पाटील, जागृती महेंद्रसिंग पाटील, ऋतिक राजेंद्र कुंभार, प्रतिभा राजेंद्र पाटील, दर्शना कदम, गायत्री ठाकरे, मणियार कासिम शेख व रोहिणी पाटील यांचा समावेश आहे.

     या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ऍड. संदीप सुरेश पाटील तसेच संस्थेच्या सचिव डॉ.सौ.स्मिता संदीप पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तसेच त्यांच्या यशाबद्दल कौतुक केले. याप्रसंगी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलचे समन्वयक डॉ.के.डी. गायकवाड यांनी स्कील अकॅडमी तर्फे राबविण्यात आलेल्या MOU मधील विद्यार्थ्यांशी निगडीत रोजगाराभिमुख उपक्रम यशस्वीरित्या राबविल्याबद्दल त्यांचाही सत्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. 

      याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी. ए.सूर्यवंशी, उपप्राचार्य प्रा.डॉ.ए.एल.चौधरी, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलचे समन्वयक डॉ.के.डी. गायकवाड तसेच समिती सदस्य डॉ.एम.एल. भुसारे, श्री.डी.डी. कर्दपवार, डॉ.आर.आर.पाटील,  श्री.एम.ए.पाटील, डॉ.एच. जे.सदाफुले आदि उपस्थित होते.

   या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री. मनीष देसले, श्री.प्रदीप बाविस्कर व श्री. विश्वनाथ पाटील यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने