झुंडशाहीमुक्त भारत संविधानास अभिप्रेत.. साहित्य संमेलनात जयसिंग वाघ यांचे मत

 झुंडशाहीमुक्त भारत संविधानास अभिप्रेत.. साहित्य संमेलनात जयसिंग वाघ यांचे मत

---------------------------------------------------


बुलढाणा /जळगाव दि.२८(प्रतिनिधी) :- 
सन १९५० पासुनच भारतात निव्वळ निवडणुका जिंकने त्या करीता झुंड़शाहिचा वापर करणे सुरु आहे , आता ही झुंड़शाहि अधिकच फोफावली आहे या विरुद्ध सर्वच राजकीय पक्ष , विचारवंत , जनता यांनी एकत्रित लढने आवश्यक आहे कारण झुंड़शाहिमुक्त भारत संविधानास अभिप्रेत आहे , भारतात असलेल्या झुंड़शाहिस जसे राजकीय पक्ष जबाबदार आहेत तसेच जनता सुद्धा जबाबदार आहे असे रोख ठोक विचार जळगाव येथील प्रसिद्व साहित्यिक व विचारवंत जयसिंग वाघ यांनी व्यक्त केले .

             बुलडाणा येथील राज्यस्तरीय साहित्य संमेलनात २४ रोजी आयोजित ' भारतीय संविधानास अभिप्रेत भारत ' या विषया वरील 

 परिसंवादात अध्यक्षस्थानावरुन भाषण करतांना वाघ बोलत होते .

           जयसिंग वाघ यांनी पुढं आपल्या भाषणात सांगितलेकि संविधानाने आपल्या देशाचे नाव प्रस्तावनेत तसेच कलम १ मध्ये ' भारत ' असे नमूद केले आहे , भारत या शब्दास मोठा इतिहास आहे तो आमचा स्वाभिमान , अस्मिता , ओळख आहे , भारत शब्द एतददेशिय आहे , याचे दाखले अनेक ग्रंथात मिळतात , असे असले तरी बहुतांश लोक भारत न म्हणता हिंदुस्तान म्हणतात . हिन्दू , हिंदुस्तान हे शब्द मोगलांची देन आहे , ते आमच्या मानसिक गुलामगिरी चे प्रतीक आहे , आम्हाला स्वाभिमानी , समताधीष्टित भारत घड़वायचा आहे कारण तसाच भारत संविधानास अभिप्रेत आहे.

          या परिसंवादात  डॉ शमशुद्दीन तांबोळी ,  ( पुणे ) ,  डॉ सीमा मेश्राम (अमरावती ) , डॉ सतीष म्हस्के ( धुळे ) यांची समायोचित भाषणे झालीत .

       स्वागत डॉ विजयालक्ष्मी वानखेड़े , सुरेश साबळे यांनी केले  तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा  अनिल रिंडे यांनी केले , कार्यक्रमास श्रोतावर्ग मोठ्या संखेने हजर होता .


-------------------------------------------------------


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने