माजी आ.सोनवणेंना कोर्टाच्या दिलासा ; लासूर येथे जल्लोष

 माजी आ.सोनवणेंना कोर्टाच्या दिलासा ; लासूर येथे जल्लोष     


लासूर ता.चोपडा,दि.१९(वार्ताहर)-चोपडा मतदारसंघाचे माजी आ.प्रा चंद्रकांत सोनवणे यांना घरकुल प्रकरणात सुनावण्यात आलेल्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आहे.त्यामुळे त्यांच्या निवडणूक लढण्याच्या मार्ग मोकळा झाला आहे.सदर निकालाच्या आनंद लासूर येथील बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे भरवत तसेच फटाक्यांची आतिशबाजी करत व्यक्त केला.

      घरकुल गैरव्यवहार प्रकरणात  माजी आ.चंद्रकांत सोनवणे यांच्यासह तत्कालीन आजी माजी नगरसेवक यांना शिक्षा सुनावत त्यांना विधानसभेची निवडणूक लढण्यास अपात्र ठरविले होते.त्यामुळे त्यांच्या जागी त्यांच्याऐवजी त्यांच्या सौभाग्यवती निवडणूक लढवत विजय संपादन केला होता.

       माजी आ.चंद्रकांत सोनवणे यांच्या माध्यमातून चोपडा मतदारसंघात विशेषतः लासूर गावात विकासाची गंगा वाहत असून कोर्टाने दिलेल्या या निकालामुळे नवचैतन्य निर्माण झाले आहे अशी भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.

        याप्रसंगी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे नेते प्रा.ए.के.गंभीर सर,कैलास बाविस्कर,ग्रा.पं सदस्य पुंडलिक महाजन,सुरेश माळी,शिवाजी पाटील तसेच मुरलीधर सोनवणे,विजय बाविस्कर,प्रकाश माळी,किशोर माळी,अजय पालीवाल,दिपक महाजन,गोकुळ महाजन,देविदास मगरे,जगन्नाथ महाजन,लक्ष्मण बाविस्कर,पिताराम बारेला,गुलाब मगरे,सुरेश महाजन,पवन महाजन यांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने