जळगाव जिल्ह्यात संत निरंकारी सत्संगाचे आयोजन
पाचोरा दि.३०(प्रतिनिधी): परमपूज्य संत सद्गुरु माता सुदिक्षा जी महाराज यांच्या असीम कृपेने निरंकारी सत्संगांचं आयोजन जळगाव जिल्ह्यातील राणीचे बांबरुड कुऱ्हा काकोडा मुक्ताईनगर खडक देवळा तालुका पाचोरा येथे करण्यात आलेले आहे.
सविस्तर वृत्त असे की सद्गुरु सुदिक्षा माताजी यांच्या असीम कृपेने नवलनाथ शेलार शेरीच वाडी सातारा ज्ञान प्रचारक यांच्या प्रमुख उपस्थितीत दिनांक 30 रोजी राणीचे बांबरुड तालुका पाचोरा ,दिनांक 31 रोजी कुऱ्हा काकोडा तालुका मुक्ताईनगर, दिनांक 1 जानेवारी 2023 रोजी खडक देवळा तालुका पाचो जररा येथे रात्री सात ते नऊ या वेळेत निरंकारी सत्संगाचा आयोजन करण्यात आलेलं आहे सत्संग समाप्तीनंतर महाप्रसादाचा कार्यक्रम व ज्ञानदानाचा कार्यक्रमाचा आयोजन करण्यात आलेलं आहे तरी परिसरातील भाविकांनी सत्संगाचा लाभ घेण्याचे आवाहन निरंकारी मंडळ जळगाव जिल्हा यांच्यातर्फे करण्यात आलेले आहे