प्रसिध्द हृदय रोगतज्ञ डॉ. दिपक पाटील यांचा वाढदिवस आदिवासी विद्यार्थ्यींनींसोबत साजरा
चोपडा दि.३०(प्रतिनिधी): येथील नृसिंह हॉस्पिटल चे प्रसिध्द हृदय रोगतज्ञ डॉ दिपक पाटील यांनी कै हि .मो करोडपती माध्यमिक विद्यालय चोपडा येथे आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने विद्यालयातील आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये खाऊ वाटप करून वाढदिवस साजरा केला.
यावेळी विद्यालयातील जेष्ठ शिक्षिका श्रीमती सी पी बडगुजर मॅडम यांनी डॉ दिपक पाटील यांचे औक्षण केले.विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री देवीलाल बाविस्कर यांनी विद्यालयाच्या वतीने डॉ दिपक पाटील यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला. विद्यार्थीनी कु.रोशनी पावरा. मंजू बारेला, तुलसी बारेला , चंदा बारेला यांनी डॉ दिपक पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात.त्यावेळी त्यांनी विद्यार्थी व शिक्षक यांच्याशी संवाद साधला. ग्रामीण किंवा आदिवासी विद्यार्थ्यांनी आपणास स्वतःला कमी लेखू नये. अभ्यास करावा, स्पर्धा परीक्षा मध्ये सहभागी व्हावे व प्रगती करावी. यावेळी त्यांच्या सोबत सौ. आशाताई पाटील, मुलगी डॉ सिमरन ,जावई डॉ प्रदिप राणा जी, डॉ लक्ष्मण मराठे,जेष्ठ शिक्षक श्री आर आर बडगुजर, श्रीमती व्ही.बी साळुंखे, श्रीमती पी सी बडगुजर , श्रीमती एस टी बोरसे, संजोग साळुंखे, अशोक बडगुजर,सुनील बडगुजर,विलास सनेर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री मंगेश भोईटे यांनी केले.आभार जेष्ठ शिक्षक श्री आर आर बडगुजर यांनी मानले.