पंचायतराज व ग्रामविकास विभाग जळगाव जिल्हा सह सहयोजक पदी प्रकाश पाटील (पप्पू दादा) यांची निवड
चोपडा दि.३०(प्रतिनिधी): नाशिक येथे आयोजित उत्तर महाराष्ट्र विभागीय बैठक श्री. गणेश काका सोमनाथ जगताप प्रदेश संयोजक भाजपा पंचायतराज व ग्रामविकास विभाग व व्हि आर पाटील अमळनेर नाशिक विभागीय सह संयोजक यांच्या आदेशान्वये चोपडा तालुक्यातील युवा मोर्चा तालुका अध्यक्ष प्रकाश पाटील (पप्पू दादा) यांची पंचायतराज व ग्रामविकास विभाग जळगाव जिल्हा सह सहयोजक पदी नियुक्ति करण्यात आली.
या निवडीबद्दल ग्रामविकास मंत्री गिरीषभाऊ महाजन,भाजपाचे जिल्हा अध्यक्ष आमदार राजुमामा भोळे, खासदार श्रीमती रक्षाताई खडसे ,खासदार उन्मेष दादा पाटील,. दुध संघाचे नवनिर्वाचित संचालक रोहीत दादा निकम ,यांनी भ्रमणध्वद्वारे प्रकाश पाटील यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शूभेच्छा दिल्या तसेच चोपडा तालुका भाजपाच्या वतीने जेष्ठ नेते भाजपा शांताराम आबा पाटील, माजी सभापती आत्माराम म्हाळके, जेष्ठ नेते चंद्रशेखर पाटील, तालुका अध्यक्ष पंकज पाटील, शहर अध्यक्ष गजेंद्र जैसवाल, जिल्हा उपाध्यक्ष राकेश पाटील,जि.प सदस्य गजेंद्र सोनवणे, एच डी सोनवणे, भरत बाविस्कर यांच्या सह तालुक्यातील संपूर्ण भाजपाच्या वतीने पप्पु दादाचे अभिनंदन करण्यात आले.