श्री शाकंभरी नवरात्र निमित्त सामुदायिक श्री दुर्गासप्तशती पाठाचे आयोजन
धरणगाव दि.३०(प्रतिनिधी)येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित धरणगाव येथे परमपूज्य गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांचे आशीर्वाद व मार्गदर्शन नुसार अब्जचंडी अंतर्गत दिनांक 30 डिसेंबर २२ ते ७ जानेवारी २3 या कालावधीत शाकंभरी नवरात्रीनिमित्त सामुदायिक श्री दुर्गा सप्तशती पाठाचे आयोजन करण्यात आलेले आहे
कार्यक्रमाचे रूपरेषा सकाळी 8.00 वाजता भूपाळी आरती नंतर सामुदायिक श्री दुर्गा सप्तशती पाठ सकाळी 8.15 ते 9.30 तसेच 10.30 नवैद्य आरती नंतर सामुदायिक श्री दुर्गा सप्तशती पाठ 10:45 ते 11:45 व संध्याकाळी 4.00 ते 5.00 या वेळेत करण्यात येणार आहे ही सेवा भारत देशावर येणाऱ्या समस्या नैसर्गिक आपत्ती अडचणी, आजारपण, कोरोनासारखे संसंसर्ग जन्य आजार नष्ट करण्यासाठीं अब्जचंडी अंतर्गत सकल्प सेवा करण्यात येत आहे, पौर्णिमेला शाकंभरी नवरात्राची सांगता सकाळी 10.30 वाजता नैवद्य आरतीला विविध प्रकारच्या 64 भाज्यांचा नैवद्य दाखवितात येतील तसेच अन्नपुर्णा पुजन व धान्याधीवास पुजेने सांगता होईल तरी जास्तीत जास्त संख्येने भाविकांनी या सामुदायिक सेवेत सहभागी व्हावे असे आवाहन श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र तालुका प्रतिनिधी राकेश मकवाने, आर पी पाटील व सुलोचना मकवाने यांनी केलेले आहे.