चोपडा वनविभागाची धाड…गौऱ्यापाडाव येथे ५५ हजारांचे सागवान जप्त

 चोपडा वनविभागाची धाड…गौऱ्यापाडाव येथे ५५ हजारांचे सागवान जप्त 


चोपडा ,दि.16(प्रतिनिधी)
तालुक्यातील गौऱ्यापाडाव येथे अवैध रित्या सागवानी लाकडाचा चोरी छुपे साठा करून ठेवल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला असून मोठ्या प्रमाणात सागवानी लाकुड कटर मशीनसह जप्त करण्याची कारवाई वनविभागाने केली आहे.

याबाबत प्राप्त माहिती अशी,वनपरिक्षेत्र अधिकारी चोपडा व रेंज स्टाफ चोपडा यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार विवेक होशिंग (वनसंरक्षक धुळे ),संजय पाटील विभागीय वन अधिकारी ( दक्षता) धुळे,प्रथमेश हडपे सहा. वनसंरक्षक चोपडा, यांच्या मार्गदर्शनाखाली  गौऱ्यापाडाव गावी  रमेश भांगा पावरा यांच्या घराची सर्च वॉरंट बजावून झडती घेतली असता घराच्या मागील बाजूस एक रंधा मशीन व साग कटसाईज नग ९७ अवैधरित्या आढळून आले.सदर मुद्देमालाचे मोजमाप ०.६७८ घ.मी.व मुद्देमाल व रंधा मशीनसह किंमत ५५०००/- इतकी असून सदर मुद्देमाल जप्त करून शासकीय वाहनाने मुख्य विक्री केंद्र चोपडा येथे जमा करण्यात आला आहे.

ही कारवाई बी के थोरात वनक्षेत्रपाल चोपडा, शिवा बारेला वनपाल सत्रासेन ,प्रशांत सोनवणे वनपाल उमर्टी ,वनरक्षक एस. के. कंखरे ,सुनील भोई ,सीमा भालेराव, संदीप पावरा ,सोनाली बारेला, उज्वला बारेला, विजया बारेला, सरला भोई ,वाहन चालक गोविंदा चौधरी व मदन मराठे वनसेवक योगेश, ऋषिकेश,विशाल यांनी  पार पाडली.याबाबत पुढील कारवाई सुरू आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने