चोपडा दि.२४(प्रतिनिधी) :- तापी सहकारी सुतगिरणी निवडणूकीच्या माघारीच्या दिवशी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी पत्रकारांस माहिती देण्यास टाळाटाळ करत अरेरावीची भाषा वापरत मुजोरी केल्याचा प्रकार केल्याने सर्वत्र प्रचंड नाराजी पसरली आहे.यावेळी महा विकास आघाडीला हेलिकॉप्टर चिन्ह मिळाले असून भारतीय जनता पार्टी यांना रोड रोलर हे चिन्ह देण्यात आले आहे तर अपक्षांना वेगवेगळ्या प्रकारची चिन्ह देण्यात आली आहेत.
तापी सहकारी सूतगिरणीची व्यवस्थापन समितीची पंचवार्षिक निवडणूक सन २०२२ ते २०२७ साठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला असून दि. २३ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजे पर्यंत माघारीची मुदत होती व दि. २४ नोव्हेंबर रोजी उमेदवारांना निशाणी ( चिन्ह ) वाटप व अंतिम यादीचे प्रकाशन कार्यक्रम होता.
सदर निवडणूक प्रक्रिया संदर्भातील अंतिम यादी घेण्यासाठी पत्रकार निवडणूक निर्णय अधिकारी एस एफ गायकवाड यांच्याकडे गेले असता व सदर निवडणूक प्रक्रियेतील अंतिम यादीची मागणी केली असता त्यांनी सदर माहिती देण्यास टाळाटाळ केली व पत्रकारांना अरेरावीची भाषा करत सदर याद्या बाहेर लावलेल्या आहेत ,त्याच्या फोटो तुम्ही काढू शकता ? मी तुम्हाला झेरॉक्स प्रत देऊ शकत नाही. मला तुम्हाला माहिती द्यायला वेळ नाही आणि पत्रकारांना माहिती देणे हे बंधनकारक नाही व सहकार कायद्यात देखील नाही असे सांगत पत्रकारांशी हुज्जत घालत माहिती देण्यास टाळाटाळ केली..सदर घटना काही उमेदवारांच्या कानावर गेली असता त्यांनी निवडणूक निर्णय अधिकारी एस एफ गायकवाड यांच्या वागणूक व वर्तणूकीबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.
कापुस उत्पादक शेतकरी मतदार संघ प्रतिनिधी (१५) , अनुसूचित जाती/जमाती प्रतिनिधी (०१) ,
महिला प्रतिनिधी (०२) , इतर मागासवर्गीय प्रतिनिधी (०१) ,भटक्या विमुक्त जाती/जमाती/विशेष मागास प्रवर्ग प्रतिनिधी (०१), बिगर कापुस उत्पादक शेतकरी मतदार संघ प्रतिनिधी (०१) एकूण जागा २१ आहेत.
२१ जागांसाठी तब्बल ५३ उमेदवार आपले भवितव्य अजमावत आहेत. त्यात महा विकास आघाडी विरुद्ध भारतीय जनता पक्ष अशी सरळ लढत होणार आहे तर ११ उमेदवार अपक्ष म्हणून निवडणूक लढवित आहेत. महा विकास आघाडीला हेलिकॉप्टर चिन्ह मिळाले असून भारतीय जनता पार्टी यांना रोड रोलर हे चिन्ह मिळाले आहे तर अपक्षांना वेगवेगळ्या प्रकारची चिन्ह देण्यात आली आहेत.