.. त्या बारीक दाढीवाल्या अनोळखीने अतिप्रसंगाला विरोध करताच विवाहितेला पेटविले

.. त्या बारीक दाढीवाल्या अनोळखीने अतिप्रसंगाला विरोध करताच विवाहितेला पेटविले


भडगाव दि.२५(प्रतिनिधी):  अतिप्रसंगाला विरोध करणाऱ्या विवाहितेला पेटवून अज्ञात व्यक्तीने तिला ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना दि.२३ रोजी घडली या प्रसंगी भडगाव पोलिसात एका ५० वर्षीय अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे

दुपारी ३ वाजेच्या सुमारास शहरातील ओमशांतीकेंद्राच्या मागे एका ५० वर्षीय अनोळखी इसमाने ४७ वर्षीय पिडी त विवाहितेचा हात पकडून अश्लील संवाद करत पिडीते च्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले तसेच यानंतर त्यांने  पिडीतेवर अतीप्रसंग केला पिडीत महिलेने विरोध करताच आगपेटीने पेटवून देत जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला

   या प्रसंगी अंगात चाॅकलेटी तपकिरी रंगाचे शर्ट, हिरवट पॅन्ट,पायात बूट, बारीक दाढी अशा वर्णनाच्या ५० वर्षीय अज्ञात व्यक्तीविरुद्ध भडगाव पोलिस स्टेशनला भादवी कलम ३०७,३५४,३५४(अ),३२३,५१० प्रमाने गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रसेन पालकर हे करीत आहेत दरम्यान पिडीत महिलेवर जळगाव येथे उपचार सुरू होता.सध्या औरंगाबाद येथील खासगी रुग्णालयात या पिडीत महिलेवर औषधोपचार सुरू असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली. घटनास्थळी पोलिस अधीक्षक एम. राज कुमार, अप्पर जिल्हा पोलिस अधीक्षक चाळीसगाव भाग रमेश चोपडे, सहाय्यक पोलीस अधीक्षक चाळीसगाव विभाग अभयसिंह देशमुख, भडगाव पोलिस निरीक्षक अशोक उत्तेकर, स्थानिक गुन्हे शाखा निरीक्षक किसनराव पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रसेन पालकर, पोलिस उप निरीक्षक गणेश वाघमारे, जळगाव फाॅरेन्सीक टिम आदींनी भेट देऊन पाहणी केली

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने