भवाळेत कृषिदूतांकडून कृषी जागरूकता उपक्रमाची अंमलबजावणी
गणपूर (ता. चोपडा)ता1(प्रतिनिधी): भवाळे(ता चोपडा)येथील शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी व नव नवीन कृषी तंत्रज्ञानाबद्दल माहिती देणे, कृषी विषयक शासकीय योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे तसेच विविध माध्यमातुन शेतकऱ्यांना जागृत करणे, यासाठी कृषिदूत मार्गदर्शन करीत आहेत.
महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत शासकीय कृषी महाविद्यालय धुळे येथील कृषिदूत मयूर गुंजाळ, प्रथमेश बयाणी,वैभव कच्छ्वा , कल्पेश खैरनार , मनिष मगर, जयदीप पाटील , ग्रामीण जागरुकता आणि कृषी औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रमा अंतर्गत भवाळे येथे आले आहेत. ग्रामीण कृषी जागरुकता या कार्यानुभव उपक्रमाला मान्यता देऊन कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ.सी.डी.देवकर यांच्या अध्यक्षतेखाली, रावे समन्वयक डॉ.संदिप पाटील, चेअरमन डॉ.पी.एन.शेंडगे,सहयोगी अधिष्ठता प्रतिनिधी डॉ. सुनिल पाटील, कार्यक्रम अधिकारी डॉ. एस.पी.पौळ व विषयतज्ञ यांच्या मार्गदर्शनाखाली कृषिदुतांनी शेतकऱ्यांसोबत संवाद साधला. भवाळे ग्रामपंचायत कार्यालयाला भेट देऊन सरपंच आनंदराव पाटील, उपसरपंच भगवान भिल व सदस्यांशी दृश्य सादरिकरणाद्वारे संवाद साधला आणि या कार्यानुभव कार्यक्रमाची संमती घेऊन सुरुवात करण्यात आली............