देशमुख महाविद्यालयात रोजगार मेळावा
भडगाव,दि.३०(प्रतिनिधी) - सौ. र. ना. देशमुख महाविद्यालयातील प्लेसमेंट सेल व वाणिज्य विभाग व रिलायन्स जिओ इन्फॉकॉम लिमिटेड, चाळीसगाव यांच्या वतीने ' स्मार्ट सेल्स ट्रेनिंग प्रोग्राम ' अंतर्गत कला, वाणिज्य व विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांच्या थेट मुलाखत घेऊन त्यांची निवड करण्यात आली.
या प्रसंगी रिलायन्स जिओ, चाळीसगाव चे सेल्स मॅनेजर श्री. महेश भोबे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून कामाचे स्वरूप समजावून सांगितले. एकूण 90 विद्यार्थ्याच्या मुलाखत घेऊन त्यांना जिओ कंपनी सोबत काम करण्याची संधी देण्यात आली. या प्रसंगी भडगाव जिओ युनिट चे सुदाम पवार यांनी देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून नेहमी सहकार्य साठी उपलब्ध राहण्याचे आश्वासन दिले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. एन. गायकवाड सर यांच्या मार्गदर्शनात हा कॅम्प घेण्यात आला. या प्रसंगी उपप्राचार्य प्रा. एस. आर. पाटील, महाविद्यालयच्या प्लेसमेंट सेलचे प्रमुख डॉ. एस. जी. शेलार सर, भूगोल विभागाचे प्रमुख व महाविद्यालयाचे समन्वयक प्रा. डॉ. एस.डी.भैसे,प्रा. एन. व्ही. चिमणकर,प्रा. एस. एम. झाल्टे, प्रा.एम.डी. बिर्ला प्रा.डी. एम. मराठे,वाणिज्य विभागप्रमुख प्रा.डॉ.एस.एन. हडोळतिकर,प्रा.एस.ए.कोळी प्रा.डॉ.गजानन चौधरी प्रा. मोहनदास महाजन व शिक्षके तर कर्मचारी वाणिज्य आणि भुगोल विभागाचे विद्यार्थी विद्यार्थीनींनी उपस्थित होते.