धरणगाव मतदार संघाच्या मंत्र्यांनी जनतेला धरले वेठीस ! - गुलाबराव वाघ यांचा जोरदार आरोप
धरणगाव,दि.०१(प्रतिनिधी)- दिवाळीपुर्वी शिंदे-फडणवीस सरकारने जनतेची दिवाळी गोड व्हावी यासाठी दिवाळी कीट जाहीर केले. परंतू दिवाळी संपूनही दिवाळीचे काहींना अपुर्ण मिळाले तर काहींना मिळालेचा नाही. धरणगाव मतदार संघाचे आमदार होवून मंत्री असून जनतेला वेठीस धरण्याचे काम सुरू आहे. असा टिकास्त्र पक्षाचे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांनी केले.
शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महाप्रबोधन यात्रेच्या दुसरा टप्पा धरणगावातून शुभारंभ होत आहे. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यासह संपर्क प्रमुख संजय सावंत, जळगाव महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील, माजी नगराध्यक्ष निलेश चौधरी यांच्यासह आदी उपस्थित होते.