मी बाळ असेल तर मला खोड्या करण्याचे सर्व अधिकार ! : सुषमा अंधारे

 मी बाळ असेल तर मला खोड्या करण्याचे सर्व अधिकार ! : सुषमा अंधारे


जळगावदि.०१(प्रतिनिधी)- ''गुलाबभाऊ मला तीन महिन्यांचे बाळ म्हणत असतील तर बाळ जसा सर्व खोड्या करतो त्या करण्याचा मला अधिकार आहे !'' अशा शब्दात शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी टिकास्त्र सोडले. तर महाप्रबोधन यात्रेतील फलक चोरण्यावर 'ये डर मुझे अच्छा लगा !' अशी प्रतिक्रिया दिली. आजपासून महाप्रबोधन यात्रेतील दुसर्‍या टप्प्यासाठी त्या जिल्ह्यात आल्या आहेत. या अनुषंगाने आज जळगावात पत्रकारांशी बोलतांना त्यांनी जोरदार टीकास्त्र सोडले.


महाप्रबोधन यात्रेच्या दुसरा टप्पा धरणगावातून शुभारंभ !




धरणगाव- शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महाप्रबोधन यात्रेच्या दुसरा टप्पा धरणगावातून शुभारंभ होत आहे. आयोजन केलेल्या कार्यक्रमाला माजी नगराध्यक्ष निलेश चौधरी यांनी उपस्थितांना संबोधित केले.  पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे, संपर्क प्रमुख संजय सावंत, सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, जळगाव महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यासह आदी उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने