आमदार सौ. लताताई चंद्रकांत सोनवणे यांच्या शुभहस्ते "आनंदाचा शिधा-दिवाळी "किट वितरणाचा शुभारंभ

 

आमदार सौ. लताताई चंद्रकांत सोनवणे यांच्या शुभहस्ते "आनंदाचा शिधा-दिवाळी "किट वितरणाचा शुभारंभ

चोपडा,दि.२३(प्रतिनिधी): येथे आनंदाचा शिधा-दिवाळी किट वितरणाचा शुभारंभ आमदार सौ. लताताई चंद्रकांत सोनवणे यांच्या शुभहस्ते करण्यात आला. संपुर्ण तालुक्यात माल वाटप करणाऱ्या गाडीला हिरवा झेंडा दाखवुन आमदार यांनी गाडी रवाना केली त्यानंतर चोपडा येथील रास्त भाव दुकानदार कांतीलाल चौधरी यांचे दुकानातील लाभार्थ्यांना आमदार सौ. लताताई चंद्रकांत सोनवणे यांचे हस्ते दिवाळी शिधाजिन्नस संच (दिवाळी किट) वाटप करणेत आले.

तालुक्यातील अंत्योदय कार्ड १०, १०७ प्राधान्य कुटुंब कार्ड ३७३९४ अशाप्रकारे एकूण ४६,५०१ शिधापत्रिकांसाठी दिवाळी शिधाजिन्नस संचाचा पुरवठा शासनाकडून होत आहे. या जिन्नसांचा पुरवठा झाल्यावर लगेच रास्त भाव दुकानदारांपर्यंत संच पाठविणेत येत असुन रास्त भाव दुकानांमार्फत या शिधाजिन्नसांचे वाटप करणेत येईल. जळगाव जिल्ह्यातील अंत्योदय आणि प्राधान्य कुटूंब योजनेच्या शिधापत्रिकाधारकांनी त्यांना जोडून दिलेल्या रास्त भाव दुकानातून सदर दिवाळी शिधाजिन्नस संच घ्यावयाचा आहे. प्रति शिधापत्रिका शिधाजिन्नसांचा एक संच देय राहील ज्यामध्ये 1 किलो रवा, 1 किलो साखर, 1 किलो चना डाळ आणि 1 लिटर पामतेलाचा समावेश आहे. प्रति संच किंमत रू. 100 मात्र राहील याची लाभार्थ्यांनी नोंद घ्यावी. शिधापत्रिकाधारकांनी पुर्ण दिवाळी शिधाजिन्नस संच घ्यावयाचा आहे, या संचामधील वस्तू सुट्या करून वाटू नये असे शासनाचे निर्देश आहेत.

तालुक्यातील अंत्योदय आणि प्राधान्य कुटूंब योजनेच्या शिधापत्रिकाधारकांनी या दिवाळी शिधाजिन्नस संचाचा लाभ घ्यावा असे आवाहन आमदार सौ. लताताई चंद्रकांत सोनवणे आणि अनिल गावित तहसिलदार चोपडा यांच्याकडून  करण्यात आले.

प्रसंगी सुकलाल कोळी, विकास पाटील, दीपक चौधरी, गोपाल चौधरी, संजय शिरसाठ, सुनील बरडीया, देवेंद्र नेटकर पुरवठा अधिकारी, योगेश नन्नवरे गोदाम व्यवस्थापक, सुनील पाटील, गणेश पाटील, बिपिन जैन, प्रल्हाद पाडवी, मंगल बाविस्कर, एस. आर. पाटील, संदीप सोनवणे, यासू बारेला इत्यादी उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने