प्रियदर्शनी क्रीडा व सांस्कृतीक मंडळाने रूग्णांना दीपावली फराळ केला वाटप..३४ वर्षाची परंपरा राजकिशोर मोदी जोपासली

 प्रियदर्शनी क्रीडा व सांस्कृतीक मंडळाने रूग्णांना दीपावली फराळ केला वाटप..३४ वर्षाची परंपरा  राजकिशोर मोदी  जोपासली 


अंबाजोगाई ,दि.२३(प्रतिनिधी):-अंबाजोगाई शहरातील प्रियदर्शनी क्रीडा, सांस्कृतिक आणि व्यायाम मंडळाने सलग ३४ व्या वर्षी स्वा रा ती मधील रुग्णांना  दीपावलीच्या निमित्ताने फराळ  वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला.मागील ३४ वर्ष अविरतपणे प्रियदर्शनी क्रीडा मंडळ हे रुग्णसेवेची सामाजिक परंपरा जोपासण्याचे कार्य करीत आहे. हीच परंपरा पुढे जोपासत आज रविवारी  दि.२३ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजता स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय रूग्णालय येथील रूग्णांना  प्रियदर्शनी सांस्कृतिक मंडळाचे संस्थापक सचिव  राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी अनेक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत दिवाळी फराळ वाटप केला .

        गेल्या ३४ वर्षापासुन अखंडीतपणे स्वामी रामानंद तीर्थ रूग्णालयातील रूग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना दिवाळी फराळ वाटपाची परंपरा प्रियदर्शनी क्रीडा मंडळाची आहे. आपण दीपावलीच्या सणापासून कुठेतरी दूर आहोत अशी भावना रूग्णांची व नातेवाईकांची होवू नये या सामाजिक दायित्वातून ही परंपरा सुरू झालेली आहे.  दीपावली निमित्त फराळ वाटपात गेली ३४ वर्ष सातत्य टिकवलेले आहे. राजकिशोर मोदी यांनी १९८९ साली प्रियदर्शनी क्रीडा, सांस्कृतीक व व्यायाम मंडळाची स्थापना केली. तेंव्हाच्या सर्व तरूण सहकार्यांनी एकत्र येवून मंडळामार्फत  विविध प्रकारची सामाजिक उपक्रम , विविध स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन  करण्याचा मानस केला होता .त्याचाच एक भाग म्हणून स्वा रा ती येथील रुग्णांसाठी हा  दिवाळी फराळ वाटपाचा कार्यक्रम सुद्धा सुरू केला. ज्याचा सकारात्मक परिणाम रूग्णांचे नातेवाईक व रूग्णांवर झाला.   

                राजकिशोर मोदी यांनी सातत्याने वेगवेगळ्या घटकांचा अभ्यास करून त्यावर काम करत आहेत. हे काम सातत्याने सुरू असून याकामात त्यांना सर्व सहकार्यांचे  पाठबळ मिळत आहे. म्हणूनच हा उपक्रम आजतागायत अविरतपणे सुरू आहे. दिवाळी फराळ वाटप करत असताना रूग्णांना दीपावली च्या शुभेच्छा देऊन त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलविण्याचे काम देखील राजकिशोर मोदी आणि त्यांचे सहकारी करत होते .

          या फराळ वाटपाच्या कार्यक्रमास राजकिशोर मोदी यांच्या समवेत, माजी आमदार पृथ्वीराज साठे, बबन लोमटे , संकेत मोदी, तानाजी देशमुख ,डॉ संदीप निळेकर, डॉ विश्वजित पवार, मनोज लखेरा , महादेव आदमाने, मोरेवाडीचे सरपंच अविनाश मोरे,कचरू सारडा, खालेद चाऊस , अमोल लोमटे, संतोष शिनगारे , धम्मा सरवदे , गणेश मसने , सुनील व्यवहारे , सुनील वाघाळकर , मोईन शेख,गोविंद पोतंगले ,विजय रापतवार, शेख खलील ,सिद्धू लोमटे,शशांक लोमटे, सय्यद ताहेर , बालाजी शेरेकर, हमीद चौधरी,सचिन जाधव ,आकाश कऱ्हाड,मयूर लखेरा, शुभम लखेरा,अकबर पठाण,भारत जोगदंड ,अमोल मिसाळ ,अझीम जरगर ,गोविंद टेकाळे, शुभम लखेरा, नरसिंग साबणे,नियामत मीर खान, ऋषी मसने, रोहित हुलगुंडे, गौरव उपाध्याय, कन्हैया सारडा,अश्विन परदेशी, कुलदीप परदेशी,प्रणव लोढा आदीसह प्रियदर्शनी क्रीडा सांस्कृतिक मंडळाचे सहकारी , राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि राजकिशोर मित्र मंडळाचे सर्व सदस्य उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने