महाजन इंग्लिश क्लासेसचे संचालक दीपक सरांनी पेटविला दिपावलीचा खरा "दीप"... निराधार माय-बापसह बालकांना दिली आपलेपणाची टीप..!

 महाजन इंग्लिश क्लासेसचे संचालक दीपक सरांनी पेटविला दिपावलीचा खरा "दीप"... निराधार माय-बापसह बालकांना दिली आपलेपणाची टीप..!


चोपडा दि.२८(प्रतिनिधी)   येथील महाजन इंग्लिश क्लास व महेंद्र बुक स्टॉल यांच्या संयुक्त विद्यमाने   दिवाळी निमित्ताने  वेले ता.चोपडा येथे अमर संस्था संचलित मानव सेवा तीर्थ व अनाथालय , वृद्धाश्रम आणि बालिकाश्रमातील गरजू  गरिब, निराधारांना  मिठाई व फरसान वाटप  करून खरी दीपावलीचा  साजरी केल्याचा प्रत्यय नुकताच आला.

खरं तर दिवाळी म्हटली की प्रत्येकाच्या घरात गोडंधोडची रेलचेल.. हास्याच्या  कारंज्या उडविण्याचा दृष्य ..लख्ख प्रकाशाने उजळून निघणारा लखलखाट अन् सोबतीला धम् आवाजाचा निनाद असा दिवाळीचा पेहराव हर पाहायला मिळतो.त्यात मात्र निराधार असलेले बाबा आजी, बालकं आणि लूळे पांगड्यांची  दैन्यावस्था असलेल्या मानवी देहाच्या जीवाची घालमेल पाहता डोळ्यात पाण्याचे तूषार असल्याने दिवाळी अंधारातच ..! आपले कोणीच नसल्याचं भाव मनी दडलेल्या मनाचा ठाव घेत आपलेपणाचा हात देण्यासाठी महाजन इंग्लिश क्लासचे संचालक श्री.दीपक महाजनसर व महेंद्र बुक स्टॉलचे प्रोपा.महेंद्र गोपीचंद पाटील यांनी  पुढे सरसावत वृध्द मायबाप व अजाण बालकांना मिठाई व फरसान वाटप करत दीपावलीचा खरा मानवी दीप प्रज्वलित करून खरी खुरी दिवाळी साजरी केली आहे.
परमेश्वराने प्रत्येकाला जन्म दिला आहे मात्र काही देह एक वेळचं अन्न पोटात टाकू शकत नाहीत एवढे मोठे दुःख  पाचवीला पूजले आहे. अशांची दिवाळी ही कायमचीच अंधारात असते.अशा रंजल्या गांजलेल्यांच्या नशिब आपणं पूर्ण बदलवू शकत नसलो तरी बुडत्याला काठीचा आधार देण्यासाठी प्रगतीशील समाजाने पुढें आलं पाहिजे. असं आवाहन करत अहो..! कुत्र्याचे लाड पुरविणाऱ्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहे मात्र मानवी देहाला लाथाळणाऱ्यांची मिजास न बघविणारी व कीव करावी अशी होत चालली आहे  तरी सज्ञान व्यक्ती या गांभीर्यावर विचार करत "एक मेकास सहाय्य करू अवघे धरू सुपंथ".. उक्ती प्रमाणे पुढे यावे असे आवाहन दीपक महाजन सरांनी केले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने