दिव्यांग सेनेच्या वतीने जळगावी १५ नोव्हेंबरला पुरस्कार वितरण सोहळा
जळगाव,दि.२२(प्रतिनिधी):
जळगाव जिल्हा दिव्यांनी सेनेच्या वतीने दिनांक 15 नोव्हेंबर 2022, मंगळवाररोजी सकाळी 10:00 वाजताअल्पबचत भवन जिल्हाधिकारी कार्यालयात पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
यात उत्कृष्ट दिव्यांग कलाकार, सामाजिक क्षेत्रातील उत्कृष्ट कार्य, दिव्यांग बांधवाना न्याय मिळवून देण्यासाठी नेहमीच तत्पर असणारे अशी उल्लेखनीय कामगिरी केल्या बद्दल त्यांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे कार्यक्रमास महाराष्ट्र चे लोकनेते आमदार एकनाथराव जी खडसे, दिव्यांग सेना राष्ट्रीय अध्यक्ष प्रसादजी साळवी सर, जिल्हाधिकारी अमन मित्तल ,जि. प.मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया , समाजकल्याण अधिकारी विजय रायसिंग , दिव्यांग विभाग वै. सा. का. अधिकारी बी.एन चौधरी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत तरी सर्व तालुक्यातील दिव्यांग बांधवानी मोठया संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन दिव्यांग सेना जिल्हाध्यक्ष अक्षय महाजन व प्रसिद्धी प्रमुख विशाल दांडगे यांनी केले आहे