राष्ट्रहिताचा विचार घेवून विद्यार्थ्यांसाठी झटणारी संघटना 'अभाविप' - श्रीकांत नेवे..संघटनेची तालुका व शहर कार्यकारणी घोषीत

 राष्ट्रहिताचा विचार घेवून विद्यार्थ्यांसाठी झटणारी संघटना 'अभाविप'  - श्रीकांत नेवे..संघटनेची तालुका व शहर कार्यकारणी घोषीत


चोपडा दि.२२(प्रतिनिधी)- विद्यार्थ्यांना राष्ट्रीय विचारांच्या प्रवाहात क्रियान्वीत करुन त्यांच्या हक्कांसाठी नेहमीच अखिल भारतीय विद्यार्थी परिषद स्थापनेपासून झटत आली आहे.त्यामुळे सध्या संघटनेत सहभागी झालेच पाहिजे. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास या संघटनेत होत असल्याची भावना जेष्ठ पत्रकार तथा अभाविपचे पूर्व कार्यकर्ते श्रीकांत नेवे यांनी व्यक्त केली.

शहरातील जेष्ठ नागरिक संघाच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.याप्रसंगी मंचावर अभाविपचे प्रांत शोध संयोजक आश्विन सुरवाडे,जिल्हा संयोजक मयूर माळी,माजी तालुकाध्यक्ष प्रा.एच.ए.पाटील होते.प्रारंभी श्री.सरस्वती आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमांना अतिथींचे हस्ते माल्यार्पण करण्यात आले.प्रास्ताविक व कार्यकारणीची घोषणा मयूर माळी यांनी केली.

यावेळी घोषीत करण्यात आलेल्या कार्यकारणीत

तालुका संयोजक - प्रशांत सोनावणे,सहसंयोजक     - विराग चौधरी,शहर मंत्री - हर्षल पाटील,सहमंत्री - उर्वेश पाटील,कोमल गोसावी, यश जगताप,कार्यालय प्रमुख - धनंजय बारी,सोशल मीडिया प्रमुख - रोहित पाटील,अभ्यास मंडळ समिती - सुमित पाटील, नेहा पाटील,एस.एफ.डी. नयन माळी,एस.एफ.एस. योगेश पाटील,ज्ञानमंथन प्रमुख - कुणाल पाटील,कलामंच प्रमुख  - चंद्रकांत चौधरी,एकलव्य प्रमुख - प्रतीक नगराळे,जिज्ञासा प्रमुख - तरुण शर्मा,थिंक इंडिया - कुणाल जैस्वाल,महाविद्यालय प्रमुख - उर्वेश पाटील,

सहप्रमुख नम्रता महाले, आदित्य पाटील,भगिनी मंडळ संचलित एम.एस.डब्ल्यू.महाविद्यालय यश जगताप,पंकज महाविद्यालय सोनल पाटील, अंकुर तडवी,प्रताप महाविद्यालय निखील चौधरी, गावप्रमुख 

कुणाल पाटील(लोणी), कुणाल जैस्वाल,सत्यम पाटील (आडगाव),रोहीत पाटील (चिंचोली)योगेश पाटील (किनगाव),लोकेश महाजन (अडावद),तुषार राजपुत (नागलवाडी),राहुल पाटील(चहार्डी),कपील बावीस्कर(चौगाव) यांचा समावेश आहे.या कार्यकारणीच्या पदाधिकाऱ्यांचे यथोचित स्वागत प्रमुख अतिथींचे हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी संयोजक आश्विन सुरवाडे यांनी आपल्या मनोगतातून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा इतिहास सांगितला.तसेच आतापर्यंत केलेल्या आंदोलनाचा आढावा घेतला.राष्ट्रकार्यासाठी वाहून घेण्याचे व अभाविपमध्ये समाविष्ट होण्याचे आवाहन केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अभिषेक सुर्यवंशी यांनी केले.

या कार्यक्रमास शाळेचे पालक हेमंत देवरे,रा.स्व.संघाचे गौरव अग्रवाल,भाजप शहराध्यक्ष गजेंद्र जैस्वाल,व्यापारी महामंडळाचे उपाध्यक्ष संजय श्रावगी,अभाविप एकलव्य प्रांत संयोजक चेतन माळी,इच्छेष काबरा (धरणगाव),पूर्व कार्यकर्ता प्रशांत सोनवणे उपस्थित होते.आभार प्रदर्शन हर्षल पाटील यांनी केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने