चोपडा प्रताप विद्या मंदिरात _दिवाळी पाडवा पहाट-कार्यक्रमात भक्ती व भाव गीतांनी रसिक चिंब

 चोपडा  प्रताप विद्या मंदिरात _दिवाळी पाडवा पहाट-कार्यक्रमात भक्ती व भाव गीतांनी रसिक चिंब


चोपडा, दि.२७(प्रतिनिधी)    दि.२६ ऑक्टोबर रोजी प्रताप विद्या मंदिरात संगीत कला दालनाच्या वतीने मराठी संस्कृतीचे मनमोहक दर्शन घडले. प्रशालेच्या प्रार्थना मंदिरात चोपडा शहरातील कलारसिक व संगीत प्रेमींनी हजेरी लावली होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीला दिवे प्रज्वलित करून माँ शारदेच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले

 शाळेतील विद्यार्थ्यांनी ईशस्तवन सादर केले व मुख्य कार्यक्रमाला सुरुवात झाली. या वेळी संगीत शिक्षक श्री. पी. बी. कोळी सर, कला शिक्षक पंकज नागपुरे सर, उपप्राचार्य श्री. जे. एस. शेलार सर, श्री.सच्चिदानंद भारती, श्री. संदीप सोनार, कु. अश्विनी ढबू, कु. वैष्णवी सोनार व विद्यार्थी घनश्याम कोळी इत्यादी सहभागी गायकांनी सुरस गायन केले. त्यावेळी श्री. नरेंद्र भावे सर व श्री .सच्चिदानंद भारती यांनी तबला वादन करून तर श्री. भागवत जाधव सर यांनी बासरी वादन करून संगीताची उत्तम साथ दिली. 

यावेळी रसिक श्रोते मंत्रमुग्ध होऊन पाडवा पहाटचा आनंद लुटत होते. कार्यक्रमाला प्रा. डॉ. प्रवीण सप्तर्षी, पुणे . संस्थेच्या सचिव माधुरीताई मयूर, समन्वयक श्री. गोविंद गुजराथी,  मुख्याध्यापक श्री. पी. एस. गुजराथी सर, उपमुख्याध्यापक श्री. एस. जी. डोंगरे सर, पर्यवेक्षक पी. डी. पाटील सर, एम. डब्ल्यू. पाटील मॅडम, अप्पा पाटील सर श्री डी टी महाजन सर ,ललित कला केंद्र ,चोपडा. येथील प्राचार्य श्री .राजेंद्र महाजन सर .माजी मुख्याध्यापिका श्रीमती अरुणाताई पाटील ,माजी मुख्याध्यापक श्री. आर .आर. शिंदे सर, तांदळवाडी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री . विलास पाटील सर श्री वसंत नागपुरे सर श्री.संजय बारी सर नागलवाडी माध्यमिक विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक श्री. ए. ए. ढबू सर सर ,श्री मनोज भाऊ चित्रकथी, श्री विजय पालीवाल सर, शाळेतील शिक्षक शिक्षिका यांच्यासह शहरातील संगीत-कला प्रेमी मंडळींनी हजेरी लावली होती.

मनोगत व्यक्त करीत असताना संस्थेच्या सचीव मा. माधुरीताई यांनी हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचे आपल्या जीवनावरील प्रभाव व गायकांचे गायनाबद्दलचे समर्पण याचे प्रेरणादायी दाखले देऊन उपस्थित गायकांना मार्गदर्शन केले .व सुंदर नियोजनासाठी कौतुकही केले. या कार्यक्रमात निवेदक म्हणून डॉ. ललित पाटील सर यांनी काम पाहिले. उपप्राचार्य श्री. जे. एस. शेलार सर यांनी उपस्थितांचे आभार मानले व या भावभक्तीने रम्य पहाट कार्यक्रमाची सांगता झाली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने