२५ लाखांसाठी विवाहितेचा छळ..२५ तारखेला गुन्हा दाखल

  २५ लाखांसाठी विवाहितेचा छळ..२५ तारखेला गुन्हा दाखल


जळगाव दि.२७  (प्रतिनिधी ) माहेरहून 25 लाख रुपये आणावे, या मागणीसाठी नशिराबाद येथील विवाहितेला शारीरिक व मानसिक छळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत मंगळवारी 25 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6 वाजता नशिराबाद पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या मंडळी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील नशिराबाद येथील माहीर असलेल्या माधवी अतुल बढे (वय-३३) यांचा विवाह पुणे येथील अतुल लीलाधर बढे यांच्याशी रीतिरिवाजनुसार झाला. लग्नाची सुरुवातीचे दिवस चांगला गेल्यानंतर विवाहितेला माहेरहून 25 लाखाची मागणी केली. विवाहितेने पैसे आणले नाही म्हणून तिचा छळ केला. तसेच तिला शिवीगाळ करून मारहाण केली. दरम्यान तसेच तिचे सासू, सासरे, ननंद यांनी देखील गांजपाठ केला.

या छळाला कंटाळून विवाहिता माहेरी निघून आल्या. मंगळवारी 25 ऑक्टोबर रोजी नशिराबाद पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली, त्यांच्या तक्रारीवरून पती अतुल लीलाधर बडे, सासरे लीलाधर डालु बढे, नांदोई दिनकर महारु राणे, नणंद सुनिता दिनकर राणे, भाची सायली दिनकर सर्व रा. रूपानगर पुणे यांच्या विरोधात नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने